बीड जिल्ह्यात २५ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश
जिल्हा प्रशासनाचा निर्णय
पाच किंवा त्याहून अधिक लोकांच्या एकत्र येण्यावर निर्बंध
योगेश काशिद, बीड
मारहाण, हत्या आणि अत्याचाराच्या घटनांमुळं मागील काही काळापासून बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या जिल्ह्यात तणावाची परिस्थिती असल्याचे सांगितले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं खबरदारी म्हणून मनाई आदेश लागू केले आहेत. २५ सप्टेंबरपर्यंत हे मनाई आदेश असतील.
बीड जिल्ह्यातील सध्याची तणावाची स्थिती लक्षात घेता २५ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. समाज माध्यमांतून विविध मुद्द्यांवरील वादग्रस्त पोस्टचे पडसाद रस्त्यावर उमटताना दिसू लागले आहेत.
काही ठिकाणी बॅनरबाजीमुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्याचबरोबर मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष सध्या पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर हे मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.
मराठवाडामुक्ती संग्राम दिन, नवरात्रौत्सवाची धूम असणार आहे. या काळात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी आजपासून २५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश लागू असतील. अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
Beed : मोठी बातमी! माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्यासोबतच्या प्रेमसंबंधाची डान्सर पूजा गायकवाडची कबुलीया दरम्यान काढण्यात येणारे मोर्चे, निदर्शने, आंदोलने यात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगीशिवाय एकत्र येण्यास निर्बंध राहतील. शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी किंवा त्यांना शस्त्रे, सोटे, काठी, बंदूक आदी वापरण्यास परवानगी नसेल.
Beed Crime: बीड पुन्हा हादरलं! लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून तरुणाचं अपहरण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल|VIDEO