अल्पवयीन मुलगी बेपत्ता
ठाणे, ता.१३ : पेण येथून कळवा येथे भेटण्यासाठी आलेल्या मित्राला शाळा बुडवून गेलेली अल्पवयीन मुलगी दुपारी उशीर झाल्याने आईवडील रागावतील या भीतीने घरीच गेली नाही. याप्रकरणी तिच्या मित्राने तिला फुस लावून पळवून नेले अशी तक्रार देण्यात आली. याप्रकरणी रेहजान नामक त्या युवकाविरोधात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नेहमीप्रमाणे (ता.११) ला सदर १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिचे काकांनी रिक्षाने शाळेत सोडले. तसेच शाळा सुटण्याचा वेळेत ते घेण्यासाठी आल्यावर ती शाळेत नसल्याचे त्यांनी त्यांच्या भावाला सांगितले. तातडीने त्या मुलीच्या आई वडिलांनी शाळेत धाव घेत शिक्षकांना विचारणा केल्यावर ती आणि तिची मैत्रीण या दोघी शाळेत आल्या नसल्याचे सांगण्यात आले. तिच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन विचारणा केल्यावर तिने त्या दोघी रायगड जिल्ह्यातील पेण येथून त्यांच्या मित्रांना भेटण्यासाठी कळवा येथे गेल्या होत्या. तेथून दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घरी येण्यासाठी निघाल्यावर तिलासोबत घरी येण्यासाठी विनवणी केल्याचे मैत्रिणीने सांगितले. पण, घरी गेल्यावर आई वडील रागावतील या भीतीने तिने नकार दिला. त्यानंतर ती एकटी घरी आल्याचे म्हटले. आलेल्या दोघांपैकी एक जण घरी पोहचला असून ते दोघे कोठे गेले माहीत नसल्याचे त्याने फोनवरून सांगितले. त्यानंतर त्या मुलीच्या पालकांनी पोलिस ठाण्यात धाव घेत, दिलेल्या तक्रारीनुसार रेहजान याच्याविरोधात दाखल करण्यात आल्याची मुंब्रा पोलिसांनी दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे