बाणेरमधील १७ वर्षीय विद्यार्थिनी ऑनलाइन मित्राच्या नादाने २,१०० किमी प्रवास करून पश्चिम बंगालला गेली.
आरोपीकडून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याने POCSO अंतर्गत गुन्हा दाखल.
पोलिसांच्या तत्परतेमुळे मुलगी सुखरूप परत आली; आरोपीला अटक.
पालकांनी मुलांशी संवाद साधून त्यांना सुरक्षिततेबद्दल जागरूक करणे आवश्यक.
विद्येचं माहेर घर असलेल्या पुण्यातून धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. बाणेरमधील १७ वर्षीय विद्यार्थिनीने ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मवर झालेल्या "मैत्रिच्या" नादाला लागून घरापासून २,१०० किलोमीटर प्रवास करत पश्चिम बंगालपर्यंत पोचली. मात्र तिच्या अपेक्षांच्या पूर्ण विरुद्ध घडले. ज्याच्यावर तिने विश्वास ठेवला त्याच्याकडून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ जुलै रोजी पीडित मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या काकांनी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात नोंदवले. पोलिसांनी तत्काळ तिच्या मोबाईल लोकेशनचा मागोवा घेतला आणि नागरकाटा, जलपाईगुडी (पश्चिम बंगाल) येथे तिचा ठावठिकाणा मिळवला. तपास अधिकारी मनीषा जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सात दिवसांच्या प्रयत्नांनंतर तिला सुखरूप परत आणले. मात्र तिच्या जबाबानंतर केवळ अपहरण नव्हे तर लैंगिक अत्याचाराचे कलम आणि POCSO अंतर्गतही गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले.
Pune Crime: पुणे स्टेशनवर जबरी चोरीचा थरार! पैसे न दिल्याने पोटात भोसकला चाकूपोलिसांच्या म्हणण्यानुसार, पीडित मुलगी इयत्ता बारावीची विद्यार्थिनी असून ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मवर एका मुळाशी तिचा संपर्क झाला. सुरुवातीला गेमच्या माध्यमातून त्यांचा संवाद सुरू झाला. हळूहळू त्यांच्यामध्ये मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण झाली आणि मेसेजिंग अॅप्सवर गप्पा रंगू लागल्या. विश्वास वाढल्यावर त्यांनी फोन कॉल्सवर बोलणे सुरू केले.
Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग; पोलिसांकडून मोठी कारवाई, ढोल ताशा पथकातील दोघांना अटकपीडित मुलीचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीने तिला गावाला येण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर पीडित मुलगी आरोपीला भेटण्यासाठी २,१०० किलोमीटर प्रवास करत पश्चिम बंगालच्या गावात पोचली. गावात पोचल्यानंतर आरोपीने तिचा लैंगिक शोषण केले. याप्रकरणी ३० वर्षीय आरोपीला अखेर ६ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली असून, सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.
Pune Crime: 'सात पिढ्या लक्षात राहतील अशी अद्दल घडवू', असं म्हणणाऱ्या पोलिस आयुक्तांना ७ आठवड्यात गुन्हेगारी रोखता आली नाहीआजच्या डिजिटल युगात मुलांना पूर्णपणे ऑनलाइन जगापासून दूर ठेवणे अशक्य आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, पालकांनीच मुलांशी संवाद साधावा, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे शिवाय त्यांच्या प्रश्नांचे निरसन करावे. दरम्यान ऑनलाइन माध्यमांचा वापर करताना सुरक्षितता आणि संवाद यांचे महत्त्व अधोरेखित करणारी ही घटना प्रत्येक पालक आणि मुलासाठी धडा ठरू शकते.