बॉलिवूडमधील कपूर कुटुंबाला नक्कीच कोणत्याच ओळखीची आवश्यकता नाही. त्या कुटुंबातील सर्वजणच स्टार आहेत. कारण प्रत्येकाची अशी बॉलिवूडमध्ये खास ओळख आहे. रणबीर कपूर हा बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक आहे आणि त्याच्या लोकप्रियतेबद्दल सर्वांनाच माहिती आहे. तो केवळ भारतातच नाही तर परदेशातही खूप लोकप्रिय आहे. कुटुंबाने आतापर्यंत इंडस्ट्रीला अनेक मोठे स्टार दिले आहेत. मग ते राज कपूर असोत, ऋषी कपूर असोत किंवा नीतू कपूर असोत. करिश्मा करीनापासून ते रणबीरपर्यंत सगळेच एकापेक्षा एक आहेत.
रणबीर हा आलिया भट्टचा चाहता नाही तर दुसऱ्याच अभिनेत्रीचा जबरा फॅन
सध्या जर कपूर कुटुंबातील कायम चर्चेत असणारं नाव म्हणजे रणबीर कपूर त्याचे अनेक चित्रपट हे पाईपलाईनमध्ये आहेत. फक्त रणबीरच नाही तर आलिया देखील एक उत्तम अभिनेत्री असून ती देखील तिच्या आगामी चित्रपटांसाठी तयारी करत आहे. तिचेही लाखो चाहते आहेत. पण रणबीरसोडून. होय रणबीर हा आलिया भट्टचा चाहता नाही तर दुसऱ्याच कोणत्या अभिनेत्रीचा जबरा फॅन आहे. रणबीर कपूरने कपिल शर्माच्या शोमध्ये स्वत: हा खुलासा केला होता.
अभिनेत्रीकडून फटकार मिळाली
रणबीर जिचा मोठा फॅन आहे ती अभिनेत्री म्हणजे ‘थोर’मध्ये जेन फोस्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री नताली पोर्टमन. त्याने एक किस्साही सांगितला आहे. तो एकदा न्यू यॉर्कमध्ये असताना. त्याला नताली दिसली अन् चक्क तो सेल्फी घेण्यासाठी तिच्या मागे धावला. पण त्याला फोटो तर मिळाला नाही पण अभिनेत्रीकडून फटकार नक्कीच मिळाली. हा किस्सा त्याने स्वत: सांगितला होता.
रणबीरने या घटनेबद्दल काय सांगितले?
त्या घटनेची आठवण करून देताना रणबीर म्हणाला, ‘मला खूप जोरात सू सू लागली होती आणि मी न्यू यॉर्कच्या रस्त्यांवर शौचालय शोधत पळत होतो. मग मी हॉलिवूड सुपरस्टार नताली पोर्टमन येताना पाहिले. तिला पाहताच मी सर्व काही विसरून तिच्या मागे धावलो आणि ओरडू लागलो , एक सेल्फी, एक सेल्फी प्लीज. त्यादरम्यान ती फोनवर कोणाशी तरी बोलत होती आणि रडत होती. मी तिच्याकडे गेलो आणि म्हणालो एक सेल्फी प्लीज. ती रागाने माझ्याकडे वळली आणि म्हणाली गेट लॉस्ट. असं म्हणत ती निघून गेली आणि माझे हृदय तुटलं. पण याचा अर्थ असा नाही की माझा फॅन्डम कमी झाला आहे. मी अजूनही तिचा चाहता आहे आणि कायम राहणार. नंतरही जर ती मला कुठेही दिसली तरी तिला मी भेटेल आणि म्हणेल ‘ एक फोटो प्लीज.’
View this post on Instagram
A post shared by Natalie Portman (@natalieportman)
रणबीरनेही क्वेंटिन टॅरँटिनोच्या मागे धाव घेतली आहे.
रणबीर कपूरने सांगितले होते की त्याला ‘पल्प फिक्शन’ सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या क्वेंटिन टैरेंटिनोसोबतही असाच अनुभव आला होता. तो म्हणाला ‘आम्ही शूटिंग करत असताना आम्हाला कळले की हॉलिवूड अभिनेता क्वेंटिन टॅरँटिनो आला आहे. मी त्याच्या मागे धावलो आणि म्हणालो. सर, कृपया एक सेल्फी घ्या. त्याने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, हो-हो. पण मग तो सरळ गाडीत बसला तेव्हा मी त्याला कारच्या खिडकीतून पाहत होतो पण त्याने नंतर माझ्याकडे पाहिलंही नाही आणि सरळ निघून गेला.’