नांदकर गावातील विद्यार्थ्यांसाठी हॅप्पी स्कूल उपक्रम
कल्याण, ता. १४ (वार्ताहर): रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणतर्फे माध्यमिक शाळा, नांदकर गाव येथे हॅप्पी स्कूल उपक्रमांतर्गत पाणी फिल्टर युनिटची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे आता शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि थंड पाण्याचे लाभ मिळणार आहेत. या उपक्रमामुळे गावातील १७० हून अधिक विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळेल.
रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणचे अध्यक्ष धीरेन्द्र सिंह, सचिव नामदेव चौधरी, पूर्वाध्यक्ष रोटेरियन दिलीप घाडगे आणि रोटेरियन नितीन माचकर यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प साकारला. शाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांसह शालेय व्यवस्थापन समितीने या सामाजिक कार्याबद्दल रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. शुद्ध पाण्याची सोय झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल होणार आहे.