रत्नागिरी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
esakal September 15, 2025 02:45 AM

फाटक हायस्कूलच्या दोघांची
बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
रत्नागिरी, ता. १४ : तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा शिर्के हायस्कूल येथे झाल्या. या स्पर्धेमध्ये फाटक हायस्कूलच्या श्रेया संजय विलणकर व आर्य किरण सावंत यांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
या स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षाखालील वयोगटाच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. मुलींच्या १७ वर्षाखालील गटातून श्रेया संजय विलणकर (इयत्ता नववी) या विद्यार्थिनीचा पाचवा क्रमांक आल. १९ वर्षाखालील गटात श्रीमान वि. स. गांगण कला, वाणिज्य व (कै.) त्रि. प. केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावीतील आर्य किरण सावंत याने पाचवा क्रमांक पटकावला. या निवडीबद्दल विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षकांचे व त्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.