Crime Sangli Islampur : इस्लामपूर येथील मार्केट यार्ड परिसरातील कृषी उत्पन्न उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना घडली. विशाल गऱ्या काळे (वय ३५, रा. रेठरे धरण, ता. वाळवा) असे मृताचे नाव आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, दोघा हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली आहेत. इस्लामपूर पोलिस त्यांच्या मागावर आहेत. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की आज दुपारी मार्केट यार्डात मृत काळे व अन्य दोघांत किरकोळ कारणातून वादावादी सुरू झाली. नंतर हे भांडण विकोपाला गेले. शेजारीच असलेल्या एका पक्ष कार्यालयाच्या दारात हे भांडण सुरू असताना तेथील लोकांनी त्यांना समजावून सांगून त्यांना बाजूला हाकलून लावले; परंतु तरीही दीड ते दोन तास हे भांडण सुरूच होते. त्याचे पर्यवसान धारदार शस्त्राने हल्ला करण्यात झाले. या हल्ल्यात विशाल गऱ्या काळे याचा जागेवरच मृत्यू झाला.
घटनेनंतर तीन तास उलटले तरी या घटनेची फिर्याद देण्यात आली नव्हती. पोलिसांना घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक संजय हारूगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. खुनाची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली होती. रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडला होता. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. रात्री उशिरापर्यंत संशयित त्या दोघांच्या शोधात होते.
Sangli Zilla Parishad : जिल्हा परिषद कारभारणींच्या हातात, सांगलीत दुसऱ्यांदा महिला आरक्षणमहिलेचाही समावेश
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एक महिला व दोन पुरुष यांच्या वाद सुरू होता. हा वाद साधारण दीड तास सुरू होता. याच किरकोळ वादातून हा हल्ला केल्याचे समजते. त्यात महिलेचाही समावेश असल्याचे काहींनी सांगितले. पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे.