जर तुम्हाला पैसे सुरक्षित जागी गुंतवायचे असतील आणि चांगला परतावा मिळवायचा असेल, तर पोस्ट ऑफीसची बचत योजना तुमच्यासाठी भरोसेमंद पर्याय सिद्ध होऊ शकते. या योजना न केवळ तुमची गुंतवणूक सुरक्षित करतात तर ७.५ टक्यांपासून ८.२ टक्क्यांपर्यंत आकर्षक व्याजही देतात. तसेच या योजनेंतर्गत टॅक्समधून सुट देखील मिळते,जी तुमची बचतीला आणखीन वाढवू शकते. चला तर पाहूयात पोस्ट ऑफीसच्या सहा प्रमुख बचत योजनांची माहिती, ज्याचा तुम्ही फायदा उठवू शकता.
१.पोस्ट ऑफीस फिक्स्ड डिपॉझिट ( FD )पोस्ट ऑफिसच्या FD योजनेत तुम्ही १,२,३ वा ५ वर्षांसाठी पैसा गुंतवू शकता. खास बाब म्हणजे ५ वर्षांच्या एफडीवर तुम्हाला ७.५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. तसेच यात योजनेत गुंतवणूक केल्यानंतर आयकर कलम ८० सी अंतर्गत टॅक्समधून सुट मिळते. ही योजना त्या लोकांसाठी चांगला पर्याय आहे जे गुंतवणूक सुरक्षित ठेवू इच्छीतात आणि ज्यांना निश्चित रिटर्न हवा असतो.
२. नॅशनल सेव्हींग सर्टिफिकीट (NSC)जर तुम्हाला ५ वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल तर NSC तुमच्यासाठी बेस्ट आहे. या योजनेवर ७.७ टक्क्यांचे व्याज मिळते. तुमच्या पैशांवर दरवर्षी व्याज वाढत रहाते. तसेच या योजनेत गुंतवणूक केल्याने टॅक्समधून सुट देखील मिळते, जी या योजनेला लाभकारी बनवते.
३. ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना जर सुरक्षित गुंतवणूक आणि चांगले रिटर्न हवे असतील त्यांच्यासाठी ही योजना बेस्ट आहे. या योजनेत ५ वर्षांसाठी गुंतवणूक करता येते आणि व्याज दर ८.२ टक्क्यांपर्यंत आहे. तुम्हा यात कमाल ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकता. या योजनेचा मोठा फायदा हा की व्याजदर ८.२ टक्क्यांपर्यंत मिळतो. त्यात किमान ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेचा आणखी एक फायदा की व्याज तिमाहीला मिळते. त्यामुळे तुम्हाला नियमित उत्पन्न मिळते.
४. सुकन्या समृद्धी योजना (SSY)मुलींचे भविष्य सुरक्षित राखण्यासाठी ही एक चांगली योजना आहे.या योजनेत वर्षाला २५० रुपये ते १.५ लाख रुपये गुंतवणूक करता येते. या योजनेवर ८.२ टक्के व्याज मिळते. योजनेचा अवधी १५ वर्षांचा आहे. आणि ही योजना २१ वर्षांत मॅच्युअर होते. ही योजना मुलींचे शिक्षण आणि लग्न यासाठी एक मजबूत आर्थिक आधार बनू शकते.
५. किसान विकास पत्र (KVP)जर तुम्हाला तुमची गुंतवणूक दुप्पट व्हावी असे वाटत असेल तर किसान पत्र योजना तुमच्यासाठी योग्य आहे. यात ११५ महिन्यात ( सुमारे ९.५ वर्षे ) तुमची जमा रक्कम दुप्पटहोते. या योजनेवर ७.५ टक्के व्याज मिळते आणि किमान १००० रुपयांपासून गुंतवणूक करतात येते. ही योजना त्या लोकांसाठी चांगली आहे. ज्यांना दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे.