पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि बॉलीवूड अभिनेत्री वाणी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट लवकरच भारतीय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आतापर्यंत या चित्रपटाच्या भारतातील प्रदर्शनावर स्थगिती होती; मात्र आता त्याला परवानगी मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘अबीर गुलाल’ २६ सप्टेंबर रोजी भारतीय चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. कथानकाच्या दृष्टीने हा एक साधा आणि भावनिक प्रेमकथानकावर आधारित चित्रपट असल्याचं निर्मात्यांचे म्हणणं आहे.
प्रेक्षकांच्या भावनांना जोडणारी ताकद या कथेत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. चित्रपटाची निर्मिती विवेक अग्रवाल, अवंतिका हरी आणि राकेश सिप्पी यांनी केली असून, दिग्दर्शनाची जबाबदारी आरती बागडी यांनी सांभाळली आहे.
Road Accident: धुळे सोलापूर महामार्गावर जीपचे टायर फुटून मोठा अपघात; अकरा जखमी, सहा गंभीरसंगीतकार अमित त्रिवेदी यांनी दिलेलं संगीतही या चित्रपटाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जात आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण लंडनमध्ये पूर्ण झालं होतं. ‘अबीर गुलाल’च्या प्रदर्शनाला अखेर भारतात परवानगी मिळाल्याने आता प्रेक्षकांना फवाद खान आणि वाणी कपूरची जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.