BJP National President J. P. Nadda: भाजप जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा; 'दिलेली आश्वासने पाळली'
esakal September 15, 2025 01:45 PM

विशाखापट्टणम: १४ कोटी सदस्य असलेला भाजप हा जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष बनला असून त्यापैकी दोन कोटी कार्यकर्ते सक्रिय आहेत, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी रविवारी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे झालेल्या सभेत केले. देशभरात भाजपचे २४० खासदार, सुमारे एक हजार ५०० आमदार आणि १७० हून अधिक विधानपरिषद सदस्य आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Marathi Sahitya Sammelan:'मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी विश्वास पाटील'; साताऱ्यात एक ते चार जानेवारीदरम्यान रंगणार साहित्यप्रेमींचा मेळा

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार हे जाबाबदारीने कार्य करत असून नागरिकांचे म्हणणे समजावून घेत त्याला प्रतिसाद देणारे आहे" असे प्रतिपादन नड्डा यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकरच्या काळात मागील ११ वर्षांत सरकारने आपली कार्यक्षमता आणि विश्वासार्हता सिद्ध केली आहे.

मात्र त्या आधी जी सरकारे होती त्यांनी विकासकामे तर केली नाहीतच पण स्वतःच्या जाहीरनाम्यातील आश्वासनेसुद्धा ते विसरले, त्यांच्या काळात घराणेशाही, भ्रष्टाचार आणि लांगुलचालनाचेच राजकारण झाले, अशी टीकाही नड्डा यांनी केली.

Union Home Minister Amit Shah: सर्व भाषांचा आदर करावा; हिंदी दिवसाचे औचित्य साधत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन दिलेली आश्वासने पाळली

‘‘भाजप हा विचारसरणीवर आधारलेला पक्ष आहे. आम्ही दिलेल्या आश्वासनांप्रमाणे कलम ३७० रद्द केले, अयोध्येत राममंदिर बांधले, सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणला, वक्फ कायद्यात सुधारणा केल्या आणि तिहेरी तलाकची प्रथा संपवली,’’ असे नड्डा म्हणाले. भारत सध्या जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, आपली संरक्षण क्षेत्रातील निर्यात सातपट वाढली असून, भारत औषधनिर्मितीतही अग्रेसर आहे. देशात आता ९२ टक्के मोबाईल फोन उत्पादन होत आहे,’’ असेही नड्डा यांनी यावेळी बोलता नमूद केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.