मुंबईत मुसळधार! ट्रॅकवर पाणी, लोकल ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलं; अनेक भागात साचलं पाणी
esakal September 15, 2025 01:45 PM

मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. राजस्थानमधून मान्सूनने रविवारी माघार घेतली. गेल्या काही वर्षात मान्सूनचा परतीचा प्रवास रखडलेला असायचा. पण यंदा हा प्रवास तीन दिवस आधीच सुरू झालाय. परतीच्या प्रवासाात मान्सून महाराष्ट्रात मुसळधार कोसळत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थितीही निर्माण झालीय. मुंबईत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण उडालीय. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत झालीय. मध्य रेल्वेच्या गाड्या १० ते १५ मिनिटं उशिरा धावत आहेत.

मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर वाढला आहे. काही भागात मुसळधार पावसाने पाणी साचलं आहे. सायन माटुंगा दरम्यान ट्रॅखवर पाणी साचलंय. यामुळे गाड्या संथ गतीने पुढे सरकत आहेत. हार्बर रेल्वे मार्गावरही लोकल ट्रेन वाहतुकीचा बोजवारा उडालाय. ट्रेन पाच ते दहा मिनिटं उशिरा सुरू आहेत.

मुंबईत ढगाळ वातावरण असून अंधार पसरला आहे. यामुळे पावसाचा जोर आणखी वाढू शकतो. पहाटेपासून मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झालाय.

Pune Rain News : पुण्यात ढगफुटी सदृश्य पावसाने घरे, गाड्या पाण्याखाली, आज शाळांना सुट्टी जाहीर; प्रशासनाचे नागरिकांना सर्कतेचे आवाहन

हवामान विभागाने मुंबई आणि उपनगरात यलो अलर्ट जारी केला आहे. आठवड्याचा पहिलाच दिवस असल्यानं या मुसळधार पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. दादर, किंग्ज सर्कल, माटुंगा, फाईव्ह गार्डन आणि हिंदमाता चौक परिसरात पाणी साचलं आहे. सध्या पाणी उपसण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती समोर येतेय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.