OMG! एक, दोन नाही...तर मातेच्या कुशीत चक्क 7 बाळं, आधी तिळे आता एकाचवेळी ४ मुलांना जन्म
Saam TV September 15, 2025 01:45 PM
  • साताऱ्यातील 27 वर्षीय महिलेने एकाचवेळी ४ बाळांना जन्म दिला

  • याआधी ५ वर्षांपूर्वी तिला ३ बाळं झाली होती

  • दोन प्रसूतींमध्ये ती एकूण ७ मुलांची आई झाली आहे

  • सातारा जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या पथकानं ही अवघड डिलिव्हरी यशस्वी केली

साताऱ्यातून एक अनोखी घटना समोर आली आहे. एका मातेनं चक्क चार बाळांना जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे याच मातेनं ५ वर्षांपूर्वी ३ बाळांना जन्म दिला होता. त्यामुळे २ प्रसुतीच्या वेळेस या महिलेनं एकूण ७ बाळांना जन्म दिला आहे. त्यामुळे तिच्या कुशीत आता ७ बाळे विसावणार आहेत.

या गोष्टीमुळे डॉक्टरांपासून नातेवाईकांना प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही आगळीवेगळी घटना सातारा जिल्हा रूग्णालयात घडली आहे. काजल विकास खाकुर्डिया (वय वर्ष २७) असे महिलेचे नाव आहे. कोरेगाव हे तिचं माहेर. बाळंतपणासाठी ती माहेरी आली होती. आता तिने एकाचवेळी ४ बाळांना जन्म दिला आहे. त्यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे.

प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लॉजवर जबरदस्ती अन् शारीरिक संबंध; १४ वर्षीय मुलीसोबत 'नको ते घडलं'

याआधी तब्बल पाच वर्षांपूर्वी काजलला तीन जुळी बाळं झाली होती. आता काजल एकूण ७ मुलांची आई झाली आहे. गुजरातमधील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या सासवडमध्ये गवंडी म्हणून काम करणाऱ्या विकास खाकुर्डिया यांच्या घरी आता सात बाळाचं अधिवास खुलणार आहे.अवघड अशी ही डिलिव्हरी शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली असून आई आणि सर्व बाळ ठणठणीत आहेत.

'अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचं रक्त, ते अर्धे पाकिस्तानी'; संजय राऊतांची जहरी टीका

या यशस्वी डिलिव्हरीसाठी डॉ. देसाई, डॉ. सलमा इनामदार, डॉ. खडतरे, डॉ. झेंडे, डॉ. दिपाली राठोड आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाने मेहनत घेतली. एका मातेच्या पोटी इतक्या लहानग्यांचा जन्म झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयात एकप्रकारे आनंदसोहळाच पाहायला मिळाला.

पुण्यात फक्त ₹७ लाखांत घर, म्हाडाची बंपर लॉटरी; हक्काच्या घरासाठी आजच अर्ज करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.