शरीर निरोगी राहण्यासाठी संतुलित आहारासोबत शांत झोपेची गरज असते. पण, हल्ली होणाऱ्या सततच्या धावपळीमुळे, अस्वास्थकर खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आरोग्यासह झोपेवर परिणाम होत आहे. अनेकांची कामामुळे झोप पूर्ण होत नाही तर काहीजण अपूर्ण झोपेमुळे त्रस्त आहेत. अपूर्ण झोपेचा संपूर्ण शरीरावर परिणाम होत असून व्यक्ती शरीरासह मनाने थकलेला दिसत आहे. जर तुम्ही सुद्धा या समस्येने त्रस्त असाल तर जाणून घेऊयात गाढ आणि शांत झोपेसाठी उपाय,
झोपण्याची वेळ निश्चित करावी –
गाढ आणि शांत झोपेसाठी सकाळी उठण्यासह रात्री झोपण्याची वेळ निश्चित करावी. कारण अवेळी उठल्यावर दिनक्रम बिघडतो.
हेही वाचा – ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतर झोप येते? टिफिनमध्ये नक्की ठेवा हे 2 पदार्थ
स्क्रीन टाईम बंद करावा –
झोपण्याआधी तासभर लॅपटॉप, टिव्हीपासून दूर राहावे. यामुळे शांत आणि गाढ झोप लागण्यास मदत होईल.
आहाराकडे लक्ष द्यावे –
झोपण्याआधी पचण्यास जड असे पदार्थ खाऊ नयेत. तसेच झोपण्याआधी 3 ते 4 तास आधी जेवण करावे.
कॅफीनपासून दूर राहावे –
चहा आणि कॉफीमध्ये कॅफीन भरपूर प्रमाणात असते. पण, कॅफीनमुळे झोपेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे शांत झोपेसाठी चहा, कॉफी पिणे टाळावे.
स्ट्रेसपासून दूर राहावे –
स्ट्रेसमुळे झोपेत बाधा निर्माण होते. अशा परिस्थितीत, स्ट्रेसपासून दूर राहण्यासाठी ध्यानधारण करता येईल.
हे ही वाचा – Ear Bud Use: कान स्वच्छ करण्यासाठी इअर बडचा वापर कितपत सुरक्षित?