आज सोन्याचे चांदीचे दर: गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याचांदीच्या दरात सातत्याने वाढ झाल्यानंतर, अखेर देशात सोने-चांदीच्या किमतीत काही प्रमाणात घट होण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेतील फेडरल रिझर्व 17 सप्टेंबरला आपले धोरण जाहीर करणार आहे. त्यापूर्वी सोन्याच्या दरातील तेजी थांबू शकते असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. दरम्यान सोन्याचे दर काल ( 14 सप्टेंबर) एक लाख 11 हजार 170 रुपये प्रति दहा ग्रॅममागे झाले होते. आज या दरात घसरण झाली असून प्रति दहा ग्रॅम सोन्याचा दर एक लाख 9 हजार 350 रुपये झाला आहे. तर किलोमागे चांदी एक लाख 28 हजार 120 रुपयांवर पोहोचली आहे. सोन्याच्या किमतीत फारशी घसरण झाली नसली तरी, यामुळे त्या खरेदीदारांना दिलासा मिळू शकतो.
पुढील आठवड्यापासून नवरात्र सुरू होत आहे आणि त्या मागोमाग सणसमारंभ आणि लग्नाचा हंगामही सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत सोन्याच्या किमती पुन्हा वाढू शकतात आणि येत्या काळात त्यात विक्रमी वाढ होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. सणासुदीच्या हंगामामुळे, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात सोन्याची मागणी जास्त असते. या काळात लोक भरपूर सोने खरेदी करतात.
गेल्या काही दिवसांपासून देशात सोन्याचे भाव गगनाला भिडत असल्याने, लोक इच्छा असूनही सोन्यात गुंतवणूक करू शकत नव्हते. आता नवरात्र, दसरा, धनतेरस, दिवाळी आणि लग्नाच्या हंगामात लोक पारंपारिकपणे सोने किंवा चांदीचे दागिने खरेदी करतात, त्यामुळे मागणी वाढण्याची अपेक्षा ज्वेलर्सना आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने स्थिर आहे आणि आता ते प्रति औंस $3600 च्या जवळपास आहे. कारण बाजार आता 17 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या फेड रिझर्व्हच्या बैठकीत व्याजदरात कपात होण्याची वाट पाहत आहे.
एकीकडे पश्चिम आशियातील संघर्ष आणि रशिया युक्रेन यांच्यातील युद्ध सुरू असल्याने सोन्याच्या दरांमध्ये वाढ होत आहे. सोने आणि चांदीचे दर सकारात्मक राहण्याचे शक्यता आहे मात्र सध्या गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकेच्या फेडरल रिझर्वच्या धोरणाकडे आहे. त्यामुळे तोपर्यंत दरात घसरण होऊ शकते अशी अटकळ बांधली जात आहे.
सोमवार, 15 सप्टेंबर रोजी, भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत कमी होऊन 109350 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. त्याच वेळी, 22 कॅरेट सोन्याची किंमत आज एक लाख 238 रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे, 18 कॅरेट सोन्याची किंमत 82013 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून भारतात चांदीचे दर तसेच आहेत, त्यामुळे 1 किलो चांदीची किंमत 128120 रुपये आहे. तर भारतात 100 ग्रॅम चांदीची किरकोळ किंमत सध्या 12812 रुपये आहे.
चेन्नईमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅम 109700 रुपयांना विकले जात आहे. त्याच वेळी, 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 100558 रुपये आहे.
आज, बेंगळुरू आणि हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 100348 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 109470 रुपये आहे.
मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 100265 रुपये आहे. त्याच वेळी, त्याच ग्रॅमचे 24 कॅरेट सोने 109380 रुपयांना विकले जात आहे.
आणखी वाचा