आशिया कप 2025 स्पर्धेच्या साखळी फेरीतील दुसर्या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. भारताने पाकिस्तानला 7 गडी राखून पराभूत केलं. यासह सुपर 4 फेरीत आपली जागा पक्की केली आहे. सामन्यादरम्यान पाकिस्तानी लोकांचे एक घृणास्पद कृत्यही समोर आले आहे. (फोटो- BCCI Twitter)
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने या सामन्यात नाबाद 47 धावांची खेळी केली. त्याने 127.03 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि 37 चेंडूत नाबाद 47 धावा केल्या. त्याच्या खेळीदरम्यान पाकिस्तानात भलतंच काही सुरु होतं. सूर्यकुमार यादवची वैयक्तिक माहिती पाकिस्तानी गुगलवर खूप काही सर्च करत होते. (फोटो- BCCI Twitter)
गुगल सर्च डेटानुसार, रात्री 8 ते रात्री 12 वाजेदरम्यान म्हणजेच सामना सुरु असताना पाकिस्तानी सूर्यकुमार यादवबाबत वैयक्तिक आयुष्याबाबत बरंच काही सर्च करत होते. त्यांचे सर्च करणारे प्रश्न पाहता आता संताप व्यक्त होत आहे. (फोटो- BCCI Twitter)
गुगलवर पाकिस्तानी लोकं सूर्यकुमार यादवची पत्नी कोण आहे? याबाबत सर्च करत होते. असं अचानक काय झालं की त्यांना सूर्यकुमारच्या पत्नीला सर्च करावं लागलं. इतकंच काय तर सूर्यकुमारच्या पत्नीचं वय किती आहे हे देखील सर्च केलं. गुगल सर्च डेटानुसार हे समोर आलं आहे. (फोटो- BCCI Twitter)
सूर्यकुमार यादवने टी20 सामन्यात शतक ठोकलं की नाही? याबाबतही त्यांना उत्सुकता होती. पण या प्रश्नाचं उत्तरं शोधेपर्यंत भारतीय संघाने बाजी मारली होती. पण उर्वरित दोन प्रश्नांबाबत संताप व्यक्त होत आहे. पाकिस्तानला पराभूत करत सुपर 4 फेरीत जागा पक्की केली होती. (फोटो- BCCI Twitter)