चवदार पदार्थ तयार करण्यासाठी ओव्याचा वापर केला जातो. यासोबतच ओवा आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. कारण याच्या सेवनाने गॅसच्या समस्या कमी होतात. दुकानांमध्ये ओवा सहज मिळेल, परंतु तुम्ही घरी कुंडीत त्याचे रोप देखील लावू शकता. बागकामाची आवड असलेले बरेच लोकं घरी विविध प्रकारच्या भाज्या आणि फळांसह ओव्याचे रोप देखील लावतात. हा असाच एक मसाला आहे जो प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असतो.
अनेक घरांमध्ये ओव्याचे रोप लावले जाते. तुम्हालाही तुमच्या बाल्कनीत कुंडीत ओव्याचे रोप कसे लावायचे आणि त्याची काळजी कशी घ्यावी ते जाणून घेऊयात.
रोप कसे लावायचे?तुम्ही एका कुंडीत ओव्याचे बियाणे लावू शकता. यासाठी, एका कुंडीत 50 टक्के सामान्य माती, 30 टक्के गांडूळखत आणि 20 टक्के वाळू मिक्स करून माती तयार करा. वाळूऐवजी तुम्ही कोको पीट देखील मिक्स करू शकता. प्रथम माती चांगली तयार करा आणि ती ओली करा. आता मातीच्या वर ओव्याचे बिया टाका आणि पुन्हा त्यावर थोडी माती टाका. त्यानंतर त्यावर पाणी टाका. काही दिवसांनी तुम्हाला त्यात ओव्याची छोटी पाने दिसतील. बियांना अंकुर फुटण्यास 7 ते 14 दिवस लागतात. या दिवसांमध्ये मातीत ओलावा ठेवा, परंतु रोपांना जास्त पाणी देऊ नका.
बाजारात एक वनस्पती आहे जी ओव्यासारखी दिसते, ज्याचा वासही सेम ओव्यासारखा येतो. तर या ओव्याची पाने ही जाड असतात. तर या झाडाचे नाव सेलरी लीफ प्लांट आहे. ती ओव्याच्या बियाण्यांपासून उगवली जात नाही. कारण खरे ओव्याचे रोप हिरव्या कोथिंबीरच्या पानांसारखे दिसते.
खताबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही पालेभाज्यांमध्ये कोरडे खत घातले तर ते पानांना चिकटू शकते. म्हणून तुम्ही खतामध्ये पाणी मिक्स करून ते रोपांना देऊ शकता. यासोबतच वेळोवेळी म्हणजे दर 15 ते 20 दिवसांनी रोपात काही खत टाकावे. जर तुमच्याकडे कडुलिंबाची पेंड असेल तर ते पाण्यात मिक्स करून रोपात टाकता येईल. ते पाणी हलक्या हातांनी झाडावर शिंपडा. दर 15 ते 20 दिवसांनी एकदा शेणखत किंवा गांडूळखत द्या. या झाडाची पाने स्वयंपाकघरात वापरता येतात. त्यात फुलेही दिसतील.
काळजी कशी घ्यावीजास्त पाणी दिल्यास झाडे कुजू शकतात. म्हणून योग्य प्रमाणात पाणी द्यावे. हिवाळ्यात, दर 3 ते 4 दिवसांनी पाणी देणे योग्य आहे आणि उन्हाळ्यात, दिवसातून एकदा पाणी द्यावे. जमिनीत जास्त ओलावा असल्यास पाणी देऊ नका. मातीचा वरचा पृष्ठभाग कोरडा दिसतो तेव्हाच पाणी द्या. 4 ते 5 तास सूर्यप्रकाशात ठेवा. जर तुम्ही ते छतावर ठेवले असेल तर दुपारच्या कडक उन्हापासून त्याचे संरक्षण करा. यासाठी तुम्ही ट्रेलीस नेट किंवा शेड नेट वापरू शकता. यामुळे रोपाचे तीव्र सूर्यप्रकाश, पाऊस आणि कीटकांपासून संरक्षण होऊ शकते. सहसा ओव्याच्या रोपावर जास्त कीटक येत नाहीत. जर पानांवर कीटक दिसले तर कडुलिंबाचे तेल फवारता येते.
कोणता ऋतू योग्य आहे?कुंडीत ओव्याचे रोप लावण्यासाठी सप्टेंबर ते ऑक्टोबर हा सर्वोत्तम महिना आहे. या झाडाला जास्त उष्णता किंवा जास्त थंडी लागत नाही, म्हणून यावेळी ओव्याचे रोप लावणे योग्य ठरेल. ओव्याचे रोप लावण्यासाठी सुमारे 15°C ते 21°C तापमान आवश्यक आहे. वसंत ऋतूच्या सुरुवातीला म्हणजेच मार्च ते मे या दिवसांमध्ये ओव्याचे रोप घरात लावा. माती ओलसर ठेवणे महत्वाचे आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)