पुणे : सोलापुर येथे सोलापुर शहर व जिल्हा बास्केटबॉल संघटना आयोजित ५०व्या तेरा वर्षांखालील (सब-ज्युनिअर) गटाच्या राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेत पुणे जिल्हाचे दोन्ही संघांनी अंतिम फेरी गाठली आहे.
केगाव येथील सिंहगड पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या बास्केटबॉल कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत रविवारी झालेल्या उपांत्य फेरीत मुलांच्या गटात आराध्य भावसारने केलेल्या २३ गुणांच्या जोरावर पुणे संघाने नागपूरचा ६८-२९ असा ३९ गुणांनी पराभव केला.
आराध्य भावसारला मयांक शर्माने (१७ गुण) सुरेख साथ दिली. पराभूत संघाकडून गीतेश जिवताडे (८ गुण) व वरद लुटेने (६ गुण) केलेली खेळी अपुरी पडली. दुसऱ्या लढतीत आग्नेय मुंबई संघाने ठाणे संघाचा ४०-१७ असा २३ गुणांनी पराभव केला यावेळी विजयी संघाकडून मयांक गायकवाड (११ गुण) व जडेन ब्रिटो (६ गुण) तर पराभूत संघाकडून आरव आरूने (७ गुण) सुरेख खेळ केला.
मुलींच्या गटात तानरिका चक्रवर्ती (८ गुण) व शिवाकासिंगने (६ गुण) केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर पुणे संघाने सातारा संघावर ४४-१५ असा २९ गुणांनी विजय मिळविला. तर उत्तर मुंबई संघाने नागपूर संघाचा ३७-३१ असा सहा गुणांनी पराभव केला.
IND vs PAK: 'पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांसोबत आम्ही उभे...' कर्णधार सूर्यकुमारची पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर मोठी प्रतिक्रियाविजयी संघाकडून काशवी मुच्याल व संध्या जयस्वारने (प्रत्येकी ९ गुण) तर पराभूत संघाकडून नेत्रा दामके (१० गुण) व सारा गुलाकारीने (९ गुण) जोरदार खेळ केला. या स्पर्धेत मुलांच्या गटात पुणे आणि आग्नेय मुंबई संघ तर मुलींच्या गटात पुणे आणि उत्तर मुंबई यांच्यात अंतिम लढती होणार आहेत.