देहू, ता. १५ : देहू परिसरात गेले दोन दिवस पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. या वर्षी ७ मे रोजी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सतत पाऊस पडत आहे. जून महिन्यात पेरणीसाठी पाऊस उघडला नाही. काही शेतकरी यांनी सोयाबीन पेरले. मात्र, आता सोयाबीनचे पीक ही पावसाच्या पाण्यात आहे. त्यामुळे शेतकरी काळजीत आहे. रविवारी दुपारी मुसळधार पाऊस पडू लागला. सोमवारी पाऊस हजेरी लावली. त्यामुळे शेतात पाणी साचले. देहू येलवाडी देहूरोड रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले. त्यात पाणी साचले. परंडवाल चौकात तळे निर्माण झाले आहे. तसेच पालखी मार्गावर वाहतूक कोंडी झाली.