छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्यातच पैठण तालुक्यात अतिवृष्टी झाली असून शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे चांगलाच हाहाकार माजवला. यात पंथेवाडी येथे दोन मेंढपाळांच्या ५४ शेळ्या, मेंढ्यांसह एक बैल, दोन गोन्हे व संपूर्ण संसारोपयोगी साहित्य आलेल्या पुरानै गोदावरील नदीत वाहून गेले आहे. यामुळे मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन दिवसांपासून जोरदार पावसाचा तडाखा बसत आहे. यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास पैठण तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. शनिवारी मध्यरात्री परिसरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे दीडच्या सुमारास शेजारील ओड्याला मोठा पूर आला. या पुरामुळे मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले आहे.
Heavy Rain : संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; दोन दिवसात १० मंडळामध्ये अतिवृष्टी, शेतातील कांदा गेला वाहूनकाही क्षणात संसार उध्वस्त
पैठणतालुक्यातील रहाटगाव येथील मेंढपाळ मल्हारी डोईफोडे व अंबादास खोलासे हे मेंढ्या चारण्यासाठी पंथेवाडी शिवारात राहत होते. मात्र ओढ्याला आलेल्या पुराने काही कळायच्या आत पुरात दोन्ही मेंढपाळांच्या १४ मैक्या, ३३ कोकरे, बोकड, शेळ्या ९ अशा ५४ शेळ्या, मॅक्रयांसह एक बैल व दोन गोन्हे तसेच सर्व संसारोपयोगी साहित्य व तीन मोबाइल वाहून गेले. सर्व संसारच वाहून गेल्याने ही दोन्ही कुटुंबे उघड्यावर आली आहेत. रविवारी या घटनेचा पंचनामा पैठणच्या तलाठी शीतल झिरपे यांनी केला.
Bhandara Rain : भंडाऱ्याला मुसळधार पावसाने झोडपले; घरात शिरले पाणी, जीवनोपयोगी साहित्याची नासाडीजायकवाडी धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला
जायकवाडी धरण परिसरात मुसळधार पाऊस होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे धरणातून पुन्हा विसर्ग वाढविण्यात आला आहे. धरणाचे १८ दरवाजे एक फूट उघडले असून यातून १८ हजार ८६४ क्युसेक पाणी गोदा पात्रात सोडण्यात आले आहे. यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली असल्याने नदी काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.