Oppo F31, F31 Pro, F31 Pro+ भारतात लाँच; 7000mAh बॅटरी अन् दमदार कॅमेरा, किती आहे प्रीमिअम स्मार्टफोनची किंमत?
esakal September 16, 2025 11:45 PM
  • ओप्पोने भारतात F31 सिरीज लाँच केली आहे

  • यामध्ये 3 दमदार फीचर्सवाले स्मार्टफोन आहेत

  • त्यांची किंमत, फीचर्सबद्दल जाणून घ्या सविस्तर

ओप्पोने भारतात नवीन F31 सिरीज लाँच केली असून यात ओप्पो F31 5G, F31 प्रो 5G आणि F31 प्रो+ 5G असे तीन शानदार मॉडेल्स समाविष्ट आहेत. ही मालिका 7,000mAh च्या दमदार बॅटरी, 50MP OIS कॅमेरा, ColorOS 15 आणि IP66-69 रेटिंगसह प्रगत AI तंत्रज्ञानाने सज्ज आहे. स्टायलिश डिझाइन आणि प्रीमियम फीचर्ससह हे स्मार्टफोन्स तरुणाईला आकर्षित करण्यासाठी सज्ज आहेत.

किंमत आणि उपलब्धता


ओप्पो F31 5G ची विक्री 27 सप्टेंबरपासून सुरू होईल. 8GB RAM + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 22,999 रुपये, तर 8GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेल 24,999 रुपयेमध्ये उपलब्ध आहे. हे मॉडेल मिडनाइट ब्लू, क्लाउड ग्रीन आणि ब्लूम रेड रंगांमध्ये येईल. F31 प्रो 5G ची विक्री 19 सप्टेंबरपासून सुरू होईल, ज्याची किंमत 8GB + 128GB साठी 26,999 रुपये, 8GB + 256GB साठी 28,999 रुपये आणि 12GB + 256GB साठी 30,999 रुपये आहे. याचे रंग डेझर्ट गोल्ड आणि स्पेस ग्रे आहेत.

Photos : सूर्याला पडले ५ लाख किमी रुंदीचे भगदाड; फुलपाखरू सारखा आकार, नासाने धक्कादायक फोटो केले शेअर

F31 प्रो+ 5G ची किंमत 8GB + 256GB साठी 32,999 रुपये आणि 12GB + 256GB साठी 34,999 रुपये असून येत्या 19 सप्टेंबरपासून जेमस्टोन ब्लू, हिमालयन व्हाइट आणि फेस्टिव्ह पिंक रंगांमध्ये उपलब्ध होईल. ही मालिका ओप्पोच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअर, फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि ऑफलाइन स्टोअरमध्ये मिळेल.

Gemini AI Photos : गुगल जेमिनीवर नवा फोटो ट्रेंड! 'हे' घ्या 20 प्रॉम्प्ट, कॉपी-पेस्ट करा अन् साध्या फोटोला द्या नवा लुक फीचर्स आणि टेक्नॉलॉजी


F31 प्रो+ 5G मध्ये 6.8-इंच AMOLED डिस्प्ले, 93.5% स्क्रीन-टू-बॉडी रेशो आणि 7.7mm स्लिम डिझाइन आहे. F31 आणि F31 प्रो मध्ये 6.57 इंच AMOLED डिस्प्ले आणि अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. प्रो+ मॉडेलमध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 प्रोसेसर, 24GB पर्यंत RAM (12GB फिजिकल + 12GB व्हर्च्युअल) आणि UFS 3.1 स्टोरेज आहे. यामुळे गेमिंग आणि मल्टिटास्किंगसाठी खूप चांगला पर्याय ठरतो. तिन्ही मॉडेल्समध्ये 50MP OIS कॅमेरा आणि AI टूल्स आहेत. ज्यामुळे फोटोग्राफी आणि व्हिडिओ करणे खूप सोपे बनतात.

FAQs
  • What is the price of the Oppo F31 series in India?
    ओप्पो F31 मालिकेची भारतातील किंमत किती आहे?

    ओप्पो F31 5G ची किंमत ₹22,999 पासून सुरू होते, F31 प्रो 5G ₹26,999 पासून, आणि F31 प्रो+ 5G ₹32,999 पासून उपलब्ध आहे.

  • When will the Oppo F31 series be available for purchase?
    ओप्पो F31 मालिका खरेदीसाठी कधी उपलब्ध होईल?

    F31 प्रो 5G आणि प्रो+ 5G 19 सप्टेंबरपासून, तर F31 5G 27 सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

  • What are the key features of the Oppo F31 series?
    ओप्पो F31 मालिकेची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत?

    यात 7,000mAh बॅटरी, 50MP OIS कॅमेरा, AMOLED डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 प्रोसेसर आणि IP66-69 रेटिंग आहे.

  • Where can I buy the Oppo F31 series in India?
    भारतात ओप्पो F31 मालिका कोठे खरेदी करू शकतो?

    ही मालिका ओप्पोच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअर, फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि ऑफलाइन रिटेल स्टोअरमध्ये उपलब्ध आहे.

  • What colors are available for the Oppo F31 series?
    ओप्पो F31 मालिकेसाठी कोणते रंग उपलब्ध आहेत?

    F31 5G साठी मिडनाइट ब्लू, क्लाउड ग्रीन, ब्लूम रेड; F31 प्रो साठी डेझर्ट गोल्ड, स्पेस ग्रे; आणि प्रो+ साठी जेमस्टोन ब्लू, हिमालयन व्हाइट, फेस्टिव्ह पिंक उपलब्ध आहेत.

  • © Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.