Maharashtra Live News Update: सोलापूर काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन
Saam TV September 16, 2025 11:45 PM
नंदुरबारमध्ये येणाऱ्या निवडणुकीत मतदान न करण्याचा शेतकऱ्यांचा घेतला पवित्रा...

प्रत्येक निवडणुकीत प्रामुख्याने गाजलेल्या शहादा तालुक्यातील रहाटयावड धरणाचा प्रश्न गेल्या 40 वर्षांपासून प्रलंबित असून सद्यस्थितीत गेल्या आठ वर्षांपासून धरणाचे काम रखडले आहे या धरणामुळे जवळपासच्या 15 गावांना पाणीटंचाईचा समस्येपासून मुक्तता होणार आहे मात्र एकदा मागणी करूनही धरणाचे काम होत नसल्याने शेतकरी आता चांगलेच आक्रमक झाले असून येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे..

Hingoli: हिंगोलीत बंजारा बांधवांनी राज्यमार्ग रोखला

औंढा नांदेड व औंढा जिंतूर दोन्ही कडे जाणारा मार्ग रोखला

हजारो आंदोलक रस्त्यावर

बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करत आंदोलन

बंजारा तरुणाची उपोषणादरम्यान प्रकृती खालावली असताना सरकार दखल घेत नसल्याने आंदोलक संतप्त

Jalna: जालन्यात वृद्ध महिला पुराच्या पाण्यात गेली वाहून

जालन्यात एक वृद्ध महिला पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे जालन्यातील बदलापूर तालुक्यातील देवपिंपळगाव गावातली घटना घडली आहे.शरदबाई काशिनाथ श्रीसुंदर असे नाव आहे. देवपिंपळगाव गावात समाज मंदिरामध्ये ही वयोवृद्ध महिला राहत होती. रात्री मुसळधार पाऊस पडला आणि समाज मंदिरा शेजारी असलेल्या ओढ्याला पूर आला. याच पुरामध्ये ही वयोवृद्ध महिला वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे...

Jalna: जालना शहरात 3 तासात 116 मिमी पावसाची नोंद..

पहाटे 2 ते 5 वाजे दरम्यान सर्वाधिक पाऊस...

जालना शहरामध्ये मध्यरात्री झालेल्या धुवाधार पावसाची नोंद झाली असून अवघ्या तीन तासात तब्बल 116 मिलिमीटर एवढी पावसाची नोंद करण्यात आलीय,

धुंवाधार पावसाने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून , रस्त्यावर घरा मध्ये तसेच मुख्य मार्केट मध्ये, पाणीच पाणी पाहायल मिळतेय...

अहिल्यानगरच्या करंजी येथे ढगफुटी सदृश्य पाऊस; निलेश लंके आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली पाहणी

अहिल्यानगरच्या करंजी येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने मोठ नुकसान झाल आहे. या पूरग्रस्त परिस्थितीची खासदार निलेश लंके आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पाहणी केली आहे. करंजी परिसरात घर, शेती, पशुधन, वाहने याचं प्रचंड नुकसान झालं आहे. पूर्वसारल्यानंतर नंतर घरामध्ये अक्षरशः चिखल झाला असून घरातील सर्व संसार उपयोगी सामान अस्तव्यस्त झाल आहे. तर प्रशासनाला मी पंचनामाचे आदेश देऊन तात्काळ मदत करण्याचे सांगितल्याचं खासदार निलेश लंके यांनी म्हटल आहे. या संदर्भात मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिला असून पाठपुरा करणार असल्याचं खासदार लंके यांनी म्हटलं आहे. यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे देखील उपस्थित होते. लवकरात लवकर शासनाला मदत करावी लागणार असल्याचं तनपुरे यांनी म्हटलं आहे.

Solapur Live News Update: सोलापूर काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे वृद्धापकाळाने निधन

- सोलापूर काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. काँग्रेस कडून त्या दोनवेळा आमदार राहिल्या आहेत.

- स्वातंत्र्यसैनिक तुळशीदास जाधव यांच्या कन्या आणि काँग्रेसच्या सक्रिय आमदार म्हणून त्यांची ओळख होती. काँग्रेस पक्षासह त्यांचा महिला चळवळीतही सक्रिय सहभाग होता.

सोलापूर शहर दक्षिण मधून काँग्रेसकडून 1872 ते 1976 या काळात त्या विधानसभेवर तर त्यानंतर त्या विधान परिषदेवर आमदार राहिल्या. आज त्यांच्यावर सोलापूर मधील हिंदू स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

NAGPUR | शिस्तपालन समितीची पुढल्या आठवड्यात बैठक घेण्यात येणार

उद्याची बैठक जी अंतर्गत बैठक आहे पुढच्या आठवड्यात राज्याचे मुख्य सचिव यासह डीजी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावणार आहोत अनेक आमदारांच्या तक्रारी आहे विशिष्ट जिल्ह्यामध्ये नवीन आयएस आयपीएस अधिकारी लोकप्रतिनिधीला पाहिजे तसा सन्मान देत नाही या सगळ्या संदर्भातला आढाव याची बैठक पुढच्या आठवड्यात घेणार आहे गरज पडल्यास जिल्हे स्तरावर सुद्धा बैठका घेऊ - नरेंद्र भोंडेकर, शिवसेना आमदार, समिती प्रमुख.

JALANA | जालना शहरातील बस स्थानक परिसरात दोन गटात हाणामारी.

जालना शहरातील बस स्थानक परिसरात दोन गटात हाणामारी. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर पाहणी करत असताना दोन गटात हाणामारी झाली. पावसाच्या पाण्यात लाकडी साहित्य वाहून गेल्यामुळे, आणि जुन्या वादामुळे एकमेकांवर आरोप करत दोन गटांमध्ये मारामारी झाली. वाद मिटवण्याच्या प्रयत्नामध्ये  अर्जुन खोतकर यांनी एकाला चापट मारली.

जमवायला पांगवण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केली, एकाला हटवण्यासाठी चापट मारावी लागली, असे अर्जुन खोतकर यांनी सांगितले

Beed : बीडच्या तलवाडा येथे लक्ष्मण हाके यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन

बीडच्या शृंगारवाडी येथील सभेत लक्ष्मण हाके यांनी मराठा मुलींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते आमचे ११ सुशिक्षित क्वालिफाईड मुलं आहेत तुमच्या अकरा मुलींचा विवाह आमच्या मुलांसोबत लावा असे वक्तव्य केल्यानंतर बीडच्या तलवाडा मध्ये लक्ष्मण हाके यांच्या पोस्टरला जोडे मारवा आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे त्याचबरोबर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे लक्ष्मण हाके यांनी आपले विधान मागे घेऊन माफी मागवी अशी महिला भगिनींनी मागणी केली आहे.

KOLHAPUR - फुटलेले भाग पूर्ववत करा, प्रारूप प्रभाग रचनेवर 55 हरकती दाखल

 कोल्हापूर महानगर पालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत शेवटच्या दिवशी तब्बल 34 हरकती आल्याने हारकती सूचनाची संख्या ५५ झाली. त्यात बहुताश प्रभागाच्या हद्दीवरील फुटलेल्या कॉलनी, गल्लीन बाबत आहेत. पूर्वीच्या एक सदस्यीय प्रभाग रचनेतील प्रभाग फोडले जाऊ नयेत. चार सदस्यीयऐवजी एक सदस्यीय प्रभाग रचना ठेवावी, भागाची नावे बदलावीत, अशाही महत्वाच्या हरकती आहेत. या सर्व हरकतींवर जिल्हाधिका-यांकडून नेमण्यात येणाऱ्या अधिकाऱ्याकडून आता २२ सप्टेंबापर्यंत एक दिवशी सुनावणी होणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी 3 सप्टेंबरला चार सदस्यीय प्रभाग रचनेसाठी प्रारूप रचना जाहीर केली. हरकती, सूचना नोंदवण्यास सांगितले होते. 15 सप्टेंबर अंतिम तारीख होती. 14 पर्यंत केवळ 21 हरकती दाखल झाल्या होत्या. त्यामुळे शेवटच्या दिवशी फार हरकती येतील अशी अपेक्षा नव्हती, पण काल 34 हरकती आल्या. त्यात बहुतांश माजी नगरसेवकांच्याच हरकती असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यांनी नोंदवलेल्या जास्तीतजास्त हरकती या चार सदस्यीय प्रभागाच्या हद्दीबाबत आहेत. त्याही निश्चित करताना काही कॉलनी, गल्ली दुसऱ्या प्रभागात जोडल्या आहेत. त्यापूर्वीच्या प्रभागाच्या हद्दीत ठेवाव्यात तसेच एक सदस्य प्रभाग रचना असताना ज्या प्रभागाच्या हद्दी होत्या त्याप्रमाणे या चार सदस्य प्रभाग रचनेत ठेवाव्यात अशी मागणी करत पूर्वीचे प्रभाग जैसे थे ठेवावेत असे मांडण्यात आले आहे.

Nalasopara Crime News : आमली पदार्थाची तस्करी करणाऱ्याला अटक; ५० लाखाचा मेफेड्रोन नावाचा अमली पदार्थ जप्त

नालासोपाऱ्यात अमली पदार्थ तस्करीसाठी आलेल्या तीन जणांना गुन्हे प्रकटीकरण शाखा २ ने अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ५० लाख रुपये किंमतीचा मेफेड्रोन नावाचा अमली पदार्थ जप्त केला आहे. हबाज हमिद शेख (२२), योगेश राजू राठोड (२२) व जाफर आसिफ शेख (२२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोवैद्यानिक अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नालासोपारा पूर्वेच्या सेंट्रल पार्क मैदानाजवळ ३ व्यक्ती अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखा २ च्या पथकाला मिळाली होती.

त्यानुसार सापळा रचून तीन जणांना ताब्यात घेऊन झडती घेतली. त्यांच्या कडे २५० ग्रॅम मेफेड्रॉन नावाचा अमलीपदार्थ मिळून आल्याने त्यांना अटक करण्यात आले आहे.

Rain News : परभणी जिल्ह्यात पावसाचा कहर गोदावरी नदीला पूर

मराठवाड्यात मागील काही दिवसापासून पाऊसाचा जोर कायम असल्यामुळे व वरच्या धरणातून म्हणजे जायकवाडी आणि माजलगाव धरणातून मोठा विसर्ग सोडला असल्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे गंगाखेड तालुक्यात गोदावरी नदी तुडूंब भरून वाहत आहे अनेक वर्षानंतर एवढ आणि पहिला मिळत असून नदी काठावर 11 मंदिर हे पाण्याखाली गेले आहेत तर नदीकाठावर असलेले 200 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नदीकाठोवर असलेल्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर गोदावरी नदी काठावर असलेल्या दशविधीक्रिया करण्यासाठी बांधण्यात आलेल्या हॉल ही पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या अडचणी होणारच आहे तर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात सूचना झाले आहे याचाच आढावा घेतला आहे

BEED | बीड: दुसऱ्या दिवशी ही बीड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

बीड जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशीही पावसाने हाहाकार माजवला असून सर्वच मस्त मंडळांमध्ये आता अतिवृष्टी झाली आहे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं असून बीडच्या आष्टी पाटोदा शिरूर कासार या भागामध्ये जोरदार पाऊस झाला आणि या पावसाच्या पाण्याची आवक सिंदफना नदी पात्रात होत आहे सिंध पण नदीपात्राला पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे शेतकऱ्यांचे या पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांकडून आता नुकसान भरपाईची मागणी होत आहे

nagpur : महात्मा फुले समता परिषदेचा गुरुवारी 18 सप्टेंबरला नागपूरला ओबीसी मेळावा..

- एकीकडे कॉंग्रेसकडून वडेट्टीवार सुद्धा आंदोलनाचा तयारीत असताना, आता समता परिषदे मेळावा घेता विदर्भात तयारी करत असल्याचं बोलल जात आहे..

- ओबीसी नेते छगन भुजबळ करणार मार्गदर्शन, ओबीसी बहुजनांना आवाहन

- महात्मा फुले समता परिषद, विविध ओबीसी संघटना आणि बहुजन यांनी मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी मधून आरक्षण देण्यास तीव्र विरोध केलेला आहे.

- महात्मा फुले सभागृह, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मार्ग, रेशीमबाग नागपूर येथे ओबीसी मेळाव्याचे आयोजन केले आहे.

- या मेळाव्यात ओबीसींचे राष्ट्रीय नेते छगनराव भुजबळ हे मार्गदर्शन करणार आहे. ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी होणार बैठक...

- या मेळाव्यासाठी ओबीसी बहुजनांनी मोठ्या संखेने नागपूरला उपस्थित राहावे असे आवाहन महात्मा फुले समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष प्रा. दिवाकर गमे, विशाल हजारे यांनी केले...

Amravati Live News Update:अमरावती मध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये धुसफूस असल्याची चर्चा

माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांच्या वाढदिवसाच्या बॅनर वरून शिवसेनेच्या उपनेत्या प्रिती बंड यांचा फोटो गायब...

काही महिन्यापूर्वीच प्रीती बंड यांनी केला होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश..

तर ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी देखील केला होता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश..

प्रीती बंड यांचा फोटो गायब असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण..

Pune : मावळच्या धामणे येथे भात पिकावर करपा रोगाचे सावट.. कृषी अधिकाऱ्यांनी केली पाहणी व मार्गदर्शन

मावळ तालुक्यातील खरीप हंगामातील महत्वाचे पीक म्हणून भातपिकांची ओळख आहे. सध्या मावळ तालुक्यात भातपिकावर मोठ्याप्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. पवनमावळ भागात भात पिकावर करपा रोगाचे प्रमाण जास्त आहे. करपा रोगावर उपाययोजना करण्यासाठी मावळ कृषि विभागाने गावोगावी मोहीम राबवली आहे. धामणे येथे कृषि अधिकारी विकास गोसावी व अश्विनी खंडागळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करपा करपा रोगाची पाहणी केली. करपा रोगावर करावयाच्या औषध फवारणी बाबत कृषि विभागामार्फत गावोगावी जाऊन आणि व्हाट्स अँप, वार्ताफलक, बैठक घेऊन कृषि अधिकारी करपा रोगाबाबत उपाययोजना बाबत प्रचार प्रसिद्धी करत आहेत

NAGPUR | विदर्भात शेतकरी आत्महत्येचे भीषण वास्तव, नागपूर विभागात गेल्या 8 महिन्यात 296 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

विदर्भात शेतकरी आत्महत्येचे भीषण वास्तव, नागपूर विभागात गेल्या 8 महिन्यात 296 शेतकऱ्यांच्या आत्महत्या 

- सरकारी पातळीवर शेतकरी आत्महत्या प्रकरणी अनास्था असल्याचे चित्र 

- एप्रिल महिन्यात सर्वाधिक 50 शेतकरी आत्महत्या, तर गेल्या ऑगस्ट महिन्यात 28 शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या

- गेल्या आठ महिन्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदतीपोटी 1 कोटी 58 लाख रुपयांचा मदतनिधी वितरित 

LATUR : लातूरच्या औसा परिसरात तुफान पाऊस, बोरगाव नकुलेश्वर जवळ्या पुलावरून पाणी

लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात मागच्या दोन दिवसापासून पाऊस होतो आहे. जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आलाय, तर औसा तालुक्यातील बोरगाव नकुलेश्वर येथे ओढ्याला  पाणी आल्याने लातूरच्या औसा येथून धाराशिवच्या तेर कडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. तर पुढील काही तास लातूर जिल्ह्याला हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा देखील दिलाय

बीड जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका, परळी तालुक्यातील शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान

बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. परळी तालुक्यातील वानटाकळी गावात तर एका शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत त्याच्या जनावरांसाठी साठवलेली कडब्याची गंजी पुराच्या पाण्यात वाहून गेली. ही घटना वानटाकळी गावात घडली.

शेतीत पिकलेल्या कडब्याची मोठी गंजी शेतकऱ्याने मेहनतीने गोळा करून ठेवली होती. पण अचानक आलेल्या पुराच्या लोंढ्याने ही गंजी पूर्णपणे वेढली आणि काही क्षणात ती पाण्यासोबत वाहून गेली. शेतकरी हतबल होऊन आपलं नुकसान डोळ्यासमोर होताना पाहत राहिला. या घटनेमुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

वाशिम जिल्ह्यात पावसानंतर आता दाट धोक्याची चादर पसरली

वाशिम जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसानंतर आज सकाळी जिल्ह्यातील काही ठिकाणी दाट धुक्याची चादर पसरली. या धुक्याचा परिणाम खरिपातील सोयाबीन,भाजीपाला या पिकांवर होण्याची शक्यता आहे. धुक्यांमुळे पालेभाज्यांनाही याचा फटका बसणार असून, शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसमोर आता धुक्याचे नवे संकट उभे राहिले आहे.

Pune Rain News : पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट, पुढचे ३ तास धो धो पावसाची शक्यता

पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिलेला असून पुढील ३ तासात जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना/विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई. वरील माहिती सचेत अँप वरून घेतलेली आहे.

बीडमध्ये पूर परिस्थिती कायम, सर्व शाळा-अंगणवाडीला आज सुट्टी

बीड जिल्ह्यामध्ये ढगफुटीजन्य पाऊस झाला असून जिल्ह्यातील सर्व तलाव हे धोक्याच्या पातळीच्या बाहेर गेले असून सर्वच नद्यांना महापूर आला आहे सर्व रस्ते व राष्ट्रीय महामार्ग बंद झाले असून सर्वच गावांचा सध्यातरी संपर्क तुटला आहे या पार्श्वभूमी वरती आता जिल्ह्यातील सर्व शाळा अंगणवाडी त्याचबरोबर इंग्लिश स्कूल यांना आज सुट्टी देण्यात आली आहे हा निर्णय बीडच्या जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी घेतला असून सर्व शाळांना आज सुट्टी असणार आहेत बरोबर नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासनासोबत संपर्क साधावा असेही आव्हान त्यांनी केले आहे.

पालकमंत्री प्रताप सरनाईक दोन दिवस धाराशिव जिल्हा दौऱ्यावर

:राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे 16 व 17 सप्टेंबर या दोन दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.आज तुळजापूरात शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त विविध स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करुन ते आढावा घेणार आहेत. तर सायंकाळी 6 ते 9 या वेळेत शिवसेना पदाधिकारी यांची बैठक घेणार आहेत. १७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री उपस्थिती लावणार आहेत या विविध कार्यक्रम सरनाईक यांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत.

Nagpur Rain News : सततच्या पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेय. खड्डे तात्काळ भरून काढावेत, या मागणीसाठी वेळाहरी परिसरात कॅाग्रेसचे स्थानिक नेते आशिष भोयर यांनी आंदोलनं केलंय. खड्ड्यांमुळे अपघात होत असून, खड्डे बुजवून रस्ते दुरुस्त करण्याची मागणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आलीय. pune Rain : शिरूर तालुक्यात पावसाचा थैमान; कांदा पिकाचे मोठे नुकसान

शिरूर तालुक्यात गेल्या रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या सुरू असलेल्या कांदा लागवडीवर या पावसाचा विशेषतः मोठा परिणाम झाला असून अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिके उद्ध्वस्त झाली आहेत.

या अनपेक्षित पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा-अपेक्षांवर पाणी फिरले असून खर्चिक लागवड कोसळण्याची वेळ आली आहे. शेतकरी वर्गात चिंता व हतबलता निर्माण झाली आहे.

शेतकरी प्रतिनिधींनी प्रशासनाला मागणी केली आहे की, जिथे जिथे पिकांचे नुकसान झाले आहे त्या सर्व भागांचा तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी.

अमरावतीत शारदीय नवरात्रीची तयारी सुरू; अंबादेवी आणी एकविरा देवी मंदिरात चांदीच्या आभूषणांना दिली जातेय नवी चकाकी

अमरावती जिल्हा सह विदर्भाच आराग्य दैवत श्री अंबादेवी आणि श्री एकविरा देवी या अमरावती शहराच्या ग्रामदैवत असून दोन्ही मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी सुरू आहे. श्री एकविरा देवी मंदिर संस्थांच्यावतीनं मंदिरातील देवीचे सर्व चांदीचे आभूषण आणि वस्तूंची खास सफाई केली जात आहे. शहरातील सुवर्णकार बांधवांच्या हातून सुरू असणाऱ्या या सफाईमुळं देवीच्या चांदीच्या आभूषणांना नवी झळझळाळी येत आहे. श्री एकविरा देवी मंदिरात देवीच्या आभूषणांसह सर्व चांदीच्या वस्तूंची स्वच्छता शहरातील सुवर्कार सेवा म्हणून करून देतात. साठ वर्षांपासून सुवर्णकार बांधव नवरात्रीच्या पर्वावर श्री एकविरा देवी मंदिरातील चांदीचे दागिन स्वच्छ करून देतात.

jalna Rain : जालना शहरात पावसाचा हाहाकार, जालना शहरात काल मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस

जालना शहरात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलाय. जालना शहरात काल मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. जालना शहरालगत असलेल्या चौधरी नगर परिसरातील जालना - मंठा महामार्गाला अक्षरशा तलावाचं स्वरूप आलं असून जालना मंठा महामार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद झालेली आहे. जालना शहरातील अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल आहे तर अनेक चार चाकी वाहन देखील वाहून गेल्याची माहिती आहे.

Latur Rain : तावरजा प्रकल्प 100% भरला, शेतकरी आणि धीरज देशमुख यांच्या हस्ते जलपूजन

लातूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरण आणि पाणी प्रकल्प 100% भरले आहेत , लातूर ग्रामीण साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा तावरजा प्रकल्प देखील 100% क्षमतेने तुडुंब भरला आहे. दरम्यान या प्रकल्पामुळे जवळपास 400 एकर क्षेत्रावरील सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.. माजी आमदार धीरज देशमुख यांनी साधारण 47 कोटी रुपये खर्च करून या प्रकल्पाचे नूतनीकरण केले आहे.दरम्यान प्रकल्प पहिल्यांदाच लवकर भरल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत, जलपूजन केले आहे. यावेळी माजी आमदार धीरज देशमुख हे देखील उपस्थित होते.

Maharashtra rain Live News Update: जालना शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस, रस्त्यांना नदीचे स्वरूप

जालना शहरात काल मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आहे. या पावसामुळे शहरातील मंठा चौफुली परिसरातील रस्त्यांना अक्षरशः नदीचा स्वरूप आल आहे. मंठा चौफुली परिसरातील रस्त्यावरून गुडघाभर पाणी वाहत आहे.

तुळजाभवानी मातेची महाआरती करुन मराठवाडा स्वाभिमान जागर याञेला सुरूवात

तुळजापुरातुन तुळजाभवानी मातेची महाआरती करुन मराठवाडा स्वाभिमान जागर याञेचा शुभारंभ करण्यात आलाय,जातीत जातीत भांडत बसण्यापेक्षा प्रत्येक तरुणाच्या हाताला काम,शेतकऱ्यांना पाणी,तरुणांना गावात काम मिळेल त्यांना गाव सोडण्याची वेळ येवु नये यासाठी झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी मराठवाडा स्वाभिमान जागर याञेचे प्रमुख नामदेवराव पाटील यांच्या वतीने ही याञा काढण्यात आली आहे.लातुर बीड जिल्ह्यातुन ही याञा धाराशिव जिल्ह्यात आली होती.मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्याने एकरी 50 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी,कृषी कर्ज माफ करावे,दल महीन्याला मराठवाड्यात मंञी मंडळाची बैठक घ्यावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.या याञेला कॉग्रेसचे वतीने पाठिंबा देण्यात आला.

जालना शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका सीना नदीला पूर, पुरामध्ये चारचाकी वाहन अडकलं

जालना शहरात काल मध्यरात्री मुसळधार पाऊस पडला आहे. या पावसामुळे जालना शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका सीना नदीला पूर आला आहे. या पुरामध्ये एक चार चाकी वाहन वाहून जाताना पुलाच्या कठड्याला अडकल आहे. तर बस स्टॅन्ड परिसरातून चारचाकी वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे..

धाराशिव जिल्ह्यात सात मंडळांत अतिवृष्टी,हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा हवालदिल

धाराशिव जिल्ह्यात मागील दोन दिवसात पावसाने जोरदार तडाखा दिला सात महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.पावसामुळे शेती शिवाराला तळ्याचे स्वरूप आले आहे काढणीस आलेले सोयाबीन व अन्य पिके देखील पाण्याखाली गेल्याने हजारो हेक्टर पिकांना तडाका बसला आहे. हातातून आलेला घास,पावसाने हिरावल्याने बळीराजा देखील हतबल झाला आहे.या अतिवृष्टीमध्ये जिल्ह्यात 51 घराची पडझड देखील झाली आहे.जिल्ह्यात सलग तीन दिवस विविध भागात जोरदार पाऊस कोसळला यामध्ये मुरूम उमरगा तालुक्यातील 22 घरांची पडझड झाली आहे तर धाराशिव तालुक्यातील 28 घरांच्या भिंती कोसळल्या आहेत.कळंब तालुक्यातील देखील एका घराची पडझड झाली आहे.नुकसानीची सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यातून आता केली जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.