वयोवृद्धाची फसवणूक
ठाणे, ता.१५ : बाळकुम येथे सेवानिवृत्त ७५ वर्षीय वयोवृद्ध अमृत लोखंडे यांनी अनोळखी इसमाने त्यांना अमेरिकन एक्स्प्रेसच्या क्रेडिट कार्ड ऑफर झाल्याचे सांगितले. तसेच त्यांना दुसऱ्या बँकेचे क्रेडिट कार्डचे दोन्ही बाजूचे फोटो तसेच आधारकार्डचे फोटो पटविण्यास सांगितल्यावर ते पाठवून दिले. त्या कागदपत्राद्वारे त्या भामट्याने तीन लाख ९२ हजार ९७० रुपयांची खरेदी करत फसवणूक केली. हा प्रकार २६ जून २०२५ घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास कापूरबावडी पोलिस करत आहेत.