मुंबई : एल्फिन्स्टन पूल शुक्रवारी वाहतुकीस बंद करण्यात आल्यानंतर वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कामकाजाचा दिवस असल्याने दादर टीटीजवळील टिळक पूल आणि भारतमाता चौकाजवळील करी रोड पुलावर सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली.
वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गांसाठी दिशादर्शक फलक लावले असले तरी वाहनचालकांना हे बदल अद्याप नीटसे कळले नसल्याने गोंधळ उडाला. त्यातच मुसळधार पावसामुळे काही भागांत पाणी साचले आणि कोंडी अधिकच वाढली. दादर टीटी परिसरात बेस्टची इलेक्ट्रिक बस बंद पडल्याने वाहतुकीला आणखी अडथळा निर्माण झाला. बस बाजूला करण्यास दीड तास लागल्याने वाहनचालक व प्रवाशांचा त्रास वाढला. एल्फिन्स्टन पूल पाडकामामुळे शिवनेरी व शिवशाही बससाठी नवीन मार्ग ठरवला आहे.
Bike Taxi Fare: इलेक्ट्रिक बाइक टॅक्सी सेवा आजपासून सुरू, पाहा किती असणार भाडे? प्रवाशांना भुर्दंडवळणदार मार्गामुळे एसटीला अधिकचा वेळ खर्ची पडणार असून, त्यामुळे त्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. परिणामी एसटीने आपल्या किमान भाड्यात २० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन भाडे मंगळवारपासून (ता. १६) लागू होणार आहे. प्रवाशांना हा अतिरिक्त भुर्दंड लागणार आहे.
१८ महिने पूल बंदमुंबईतील परळ-एल्फिन्स्टन येथे असलेला १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन रोड पूल शुक्रवारपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. अधिकाऱ्यांच्या मते, नवीन पुलाचे बांधकाम ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होईल आणि तो २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. या काळात, प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
स्मार्टफोनचे चार्जर नेहमी पांढऱ्या रंगाचे का असतात?