Maharashtra Politics: मराठवाड्यात भाजपसह पवारांना मोठा धक्का, अनेक बड्या नेत्यांसह २० सरपंचांचा ठाकरे सेनेत प्रवेश
Saam TV September 17, 2025 03:45 AM
Summary -
  • मराठवाड्यात भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केला.

  • २० सरपंच आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

  • या प्रवेशामुळे ठाकरे सेनेची ताकद मराठवाड्यात वाढली आहे.

  • स्थानिक निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपू्र्वी राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये इनकमिंक आणि आऊटगोईंग सुरूच आहे. अशामध्ये मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. तुळजापूर आणि धाराशिवमधील भाजप, काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीमधील अनेक बड्या नेत्यांसह पदाधिकारी आणि २० सरपंचांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

Maharashtra Politics: 'देवा तूच सांग' नाशिकमध्ये शरद पवार गटाने भाजपला डिवचले; शहरात 'या' बॅनरची चर्चा|VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूरआणि धारशिवमधील भाजप, काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. सुरुवातीला तुळजापूरमधील पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला. यामध्ये २० सरपंच आणि काही उपसरपंच, माजी पंचायत समिती आणि अनेक सोसायटी सदस्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर धाराशिवमधील देखील अनेक पादिकाऱ्यांनी ठाकरे सेनेमध्ये प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी सर्वांच्या हातामध्ये शिवबंधन बांधले. या पक्षप्रवेशामुळे मराठवाड्यामध्ये उद्धव ठाकरे गटाची ताकद वाढली आहे.

Maharashtra Politics: ठाण्यापाठोपाठ कोकणातही महायुतीत वाद? वर्चस्वाचं राजकारण, भगव्या शालीचं कारण?

उद्धव ठाकरे यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना भारत-पाकिस्तान सामन्यावरून भाजपवर सडकून टीका केली. त्यांनी सांगितले की, 'त्यांना देशभक्ती माहिती नाही त्यांना खुर्चीभक्ती, शहाभक्ती , मोदीभक्ती माहिती आहे. भाजपचं देशभक्तीचे ढोंग उघडं पडलं. मॅच खेळले नसते तर काय फरक पडला असता. पाकिस्तानचे मित्र की शत्रू असा प्रश्न जग विचारत आहे. जगातील इतर देश भारताच्या पाठिशी का उभे राहिले नाहीत. भाजपला लाज वाटली पाहिजे. परराष्ट्रनिती देशासाठी तारक नाही. जय शहांच्या हट्टापायी हे केलं. खेळाडूंवर दबाव होता.'

Maharashtra Politics: ...तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना भेटू नये, शिंदेंच्या मंत्र्यांनी तोफ डागली|VIDEO

देवाभाऊ जाहिरावरून उद्धव ठाकरे संतप्त झाले आहेत. यावर टीका करताना ते म्हणाले की, 'देवाभाऊंच्या नावानं करोडो रुपयांची जाहिरात काढली. जाहिरातीवर ऐवढे पैसे खर्च करण्याची गरज काय? राज्याचं दिवाळं निघालं अन् सरकार कर्ज काढून दिवाळी करत आहे. राज्यावर ९ लाख कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. करोडो रुपये तुम्ही स्वत:च्या जाहीरातीसाठी खर्च केले. ते पैसे शेतकऱ्यासाठी का खर्च केले नाही? शेतकऱ्यांचे नुकसान डोळ्यासमोर दिसत आहे. शेतकऱ्यांना तातडीची मदत दिली पाहिजे होती. पंचनामे करून नुकसान भरपाई दिली पाहिजे.'

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये धुसफूस, दोन नेत्यांमध्ये संघर्ष असल्याची चर्चा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.