आयकर रिटर्न दाखल केल्यानंतर रिफंड किती वेळात मिळतो हा प्रश्न सगळ्यांना पडतो.
लहान रकमेचे रिफंड काही दिवसांत, कधी कधी काही तासांतच मिळतात.
मात्र कॅपिटल गेन किंवा बिझनेस इनकमसारखे गुंतागुंतीचे रिटर्न तपासणीमुळे एका महिन्यापर्यंत अडकू शकतात. उशीर झाल्यास विभाग 6% व्याजही देतं.
ITR Refund: आयकर रिटर्न (ITR) फाईल केल्यानंतर रिफंड कधी मिळणार हा प्रश्न अनेक करदात्यांच्या मनात असतो. याचं उत्तर म्हणजे, वेळ ठरलेली नाही, कारण रिटर्नच्या स्वरूपावर हे अवलंबून असतं. छोट्या रकमेचे रिफंड काही दिवसांतच खात्यात येतात, तर गुंतागुंतीच्या रिटर्नला एका महिन्यापर्यंत वेळ लागू शकतो. चांगली बाब म्हणजे, उशीर झाल्यास विभाग रिफंडसोबत व्याजही देतं.
शेवटचा दिवसआज (16 सप्टेंबर 2025) आर्थिक वर्ष 2025-26 साठी आयकर रिटर्न दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. आयकरपोर्टलवरील आकडेवारीनुसार, 14 सप्टेंबरपर्यंत 6.69 कोटी रिटर्न आधीच दाखल झाले आहेत.
Gold vs Sensex: सोनं की शेअर बाजार कशात गुंतवणूक करावी? कोणी दिला जास्त परतावा? जाणून घ्या इसिहासयापैकी 6.03 कोटी रिटर्न वेरिफाय झाले असून सुमारे 4 कोटी रिटर्न प्रोसेस झाले आहेत. गेल्या वर्षी ही संख्या 7.28 कोटी होती. त्यामुळे आज लाखो करदाते शेवटच्या क्षणी रिटर्न फाइल करण्यासाठी धाव घेतील अशी शक्यता आहे. मात्र, अनेक जणांना पोर्टलच्या संथ गतीमुळे अडचणी येत आहेत.
रिफंड किती वेळात मिळतो?माजी प्रिन्सिपल कमिशनर (इनकम टॅक्स) आणि टॅक्स एक्स्पर्ट ओ.पी. यादव यांच्या मते, “रिफंड मिळण्याचा कालावधी सेक्शन 143(1) अंतर्गत होणाऱ्या तपासणीनुसार ठरतो. छोटे रिफंडत्याच दिवशी मिळू शकतात, काही वेळा 7-10 दिवसांचा वेळ लागू शकतो.” नव्या आर्थिक वर्षात डिडक्शन आणि एक्सेम्प्शन तपासणीमुळे काहींना थोडा जास्त वेळ लागू शकतो.
ITR Filing Deadline: उद्यापासून 5,000 दंड; ITR भरण्याचा आज शेवटचा दिवस, 5 मिनिटांत स्वतः करा फाईलमुंबईचे चार्टर्ड अकाउंटंट चिराग चौहान सांगतात, “ज्या रिटर्नमध्ये कॅपिटल गेन किंवा व्यवसायिक उत्पन्नासारख्या गुंतागुंतीच्या गोष्टी असतात, त्याची क्रॉस-चेकिंग करावी लागते. त्यामुळे रिफंड उशिरा मिळतो.” लहान रिफंड (₹15,000 पेक्षा कमी) काही वेळा एका तासातसुद्धा खात्यात जमा होतो.
रिफंड उशिरा मिळाला तर काळजी करण्याचं कारण नाही. कारण आयकर विभाग 6% वार्षिक व्याजही देतं. हे व्याज 1 एप्रिलपासून लागू होतं. त्यामुळे करदात्यांचं नुकसान होत नाही.
FAQsप्र.1: आयकर रिटर्ननंतर रिफंड किती वेळात मिळतो?
Q1: How long does it take to get an income tax refund after filing ITR?
लहान रिफंड काही तासांत किंवा काही दिवसांत मिळतात. गुंतागुंतीचे रिटर्न 3-4 आठवडे लागू शकतात.
Small refunds may be credited within hours or days, while complex returns can take up to 3–4 weeks.
प्र.2: रिफंड उशिरा मिळाल्यास काय होतं?
Q2: What happens if the refund is delayed?
विभाग 6% वार्षिक व्याज देतं. हे व्याज 1 एप्रिलपासून लागू होतं.
The department pays 6% annual interest on delayed refunds, applicable from April 1.
प्र.३: कोणत्या रिटर्नमध्ये जास्त वेळ लागतो?
Q3: Which types of returns take longer to process?
कॅपिटल गेन, बिझनेस इनकम किंवा मोठे डिडक्शन असलेल्या रिटर्नची तपासणी जास्त वेळ घेते.
Returns involving capital gains, business income, or large deductions usually take longer.
प्र.4: रिफंड तपासण्यासाठी काय करावे?
Q4: How can I check the refund status?
आयकर विभागाच्या ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करून ‘Refund Status’ तपासता येतो.
You can log in to the Income Tax e-filing portal and check under ‘Refund Status’.
प्र.5: ₹15,000 पेक्षा कमी रिफंड पटकन मिळतो का?
Q5: Do refunds below ₹15,000 get processed faster?
हो, काही वेळा एका तासातसुद्धा रक्कम खात्यात येते.
Yes, in some cases, refunds below ₹15,000 are credited within an hour.