मुंबई : दादर कबुतरखाना बंद करण्याच्या वादानंतर आता बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्क येथे नवीन कबुतरखान्याचे उद्घाटन रविवारी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. आदिनाथ दिगंबर जैन मंदिरातर्फे ‘तीन मूर्ती पोदनपूर’ येथे उभारण्यात आलेल्या या कबुतरखान्यामुळे पक्षीप्रेमी आणि जैन समाजाने समाधान व्यक्त केले. लोढा यांनी यापुढे प्रत्येक वॉर्डात अधिकृत कबुतरखाना सुरू करण्याचा विचार या वेळी व्यक्त केला.
कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांमुळे शहरात कबुतरखान्यांनाविरोध वाढला असून, प्रकरण न्यायालयात गेले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सध्या दादर कबुतरखाना बंद आहे आणि नियंत्रित पद्धतीने खाद्य घालण्याबाबत नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. कबुतरखान्यांना स्थानिकांचा कडाडून विरोध होत आहे.
स्मार्टफोनचे चार्जर नेहमी पांढऱ्या रंगाचे का असतात? ३०० सूचना आणि हरकतीमहापालिकेनेकबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य घालण्याबाबत पालिकेकडे सुमारे ३०० सूचना-हरकती प्राप्त झाल्या आहेत. मुंबई महापालिकेने कबुतरांना खाद्य घालण्यास मनाई केल्यानंतर काही पक्षीप्रेमींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
त्या वेळी दादर येथील कबुतरखान्याजवळील कबुतरांना दररोज सकाळी ६ ते ८ या वेळेत खाद्य देण्याच्या मागणीचा विचार सुरू असल्याची माहिती महापालिकेने उच्च न्यायालयात दिली. त्यावर सूचना-हरकती घेण्याचे आदेश दिले होते.
मंत्री मंगलप्रभात लोढा हे प्रत्येक वॉर्डात कबुतरखाने सुरू करण्याचा विचार करीत आहेत. हा प्रकार मनमानी करण्यासारखा आहे. त्याला सर्वांनी विरोध करायला हवा.
- डी. स्टॅलिन, पर्यावरणतज्ज्ञ
प्रत्येक प्रभागात कबुतरखाने सुरू करण्याचा प्रकार म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीत विशिष्ट समाजाला खूश करण्यासाठी आणि त्यांची मते मिळवण्यासाठी हे प्रयत्न सुरू झाले आहेत.
- हर्षल प्रधान, प्रवक्ते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष
समुद्राखाली टाकलेल्या इंटरनेट केबलचे मालक कोण?भाजप व्होटबॅंकेसाठी लोकांचे आरोग्य आणि भावनेशी खेळत आहे. त्यामुळेच लोकांच्या प्रश्नांऐवजी ते प्रत्येक वॉर्डात कबुतरखाने सुरू करणार आहेत. मानवी वस्तीत हे कबुतरखाने नकोत.
- सुरेशचंद्र राजहंस, प्रवक्ते, काॅँग्रेस