West Indies announce 15-member squad for India tour : येत्या २ ते १४ ऑक्टोबरदरम्यान भारत विरुद्ध वेस्ट इंडीजयांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. अहमदाबाद आणि दिल्ली येथे हे सामने खेळवण्यात येणार असून त्यासाठी वेस्ट इंडीजच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज शिवनारायण चंदरपॉलच्या मुलाचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय आणखी दोन नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
द्विपक्षीय मालिकेसाठी वेस्ट इंडीजचा हा भारत दौरा तब्बल ७ वर्षांनी होतो आहे. वेस्ट इंडीजसाठी ही मालिका वर्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नव्या चक्रातील पहिली मालिका असणार आहे. या संघात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील संघाच्या तुलनेत तीन बदल करण्यात आले आहेत. तागेनारिन चंदरपॉल, अॅलिक अथानाझ तसेच डावखुरा फिरकी गोलंदाज खारी पियरे यांना संधी देण्यात आली आहे.
Asia Cup 2025 Super Four Scenario: भारतीय संघ पात्र, पाकिस्तानची बहिष्कारची धमकी; मग, उर्वरित ३ संघ कसे ठरणार?चंदरपॉल आणि अथानाझ यांना फलंदाज म्हणून तर खारी पियरे याला अतिरिक्त फिरकीपटू म्हणून संघात घेण्यात आलं आहे. खारी पियरेने वेस्ट इंडीज चॅम्पियनशिपमध्ये 41 बळी घेत सर्वांना प्रभावित केलं. याशिवाय गुडाकेश मोती याला आगामी आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर विश्रांती देण्यात आली आहे.
यासंदर्भात बोलताना, वेस्ट इंडीज संघाचे मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी म्हणाले, की “भारतीय उपखंडात खेळणे नेहमीच आव्हानात्मक असते. येथील परिस्थितीत लक्षात घेऊन आम्ही संघ निवडला आहे. हा आमचा दुसरा कसोटी दौरा आहे, परंतु आम्ही एकजुटीने आणि आमच्या शैलीनुसार काय खेळ करू शकतो हे यापूर्वी दाखवून दिले आहे” पुढे बोलताना “तागेनारिन चंदरपॉल याच्या पुनरागमनामुळे फलंदाजी मजबूत होईल'', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
Asia Cup 2025 : आशिया कपमधून माघार घेतल्यास पाकिस्तान बोर्ड लागणार भिकेला? तब्बल 'इतक्या' दशलक्ष डॉलरचं होईल नुकसान वेस्ट इंडीज कसोटी संघरोस्टन चेस (कर्णधार), जोमेल वॉरिकन (उपकर्णधार), केव्हलॉन अँडरसन, अॅलिक अथानाझ, जॉन कॅम्पबेल, तागेनारिन चंदरपॉल, जस्टिन ग्रीव्हज, शाय होप, टेव्हिन इमलाच, अल्झारी जोसेफ, शमार जोसेफ, ब्रँडन किंग, अँडरसन फिलिप, खारी पियरे, जेडन सिल्स