किवळे रावेत सोसायटीची सभा उत्साहात
esakal September 18, 2025 03:45 AM

किवळे, ता.१७ : किवळे - रावेत सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा सोसायटी अध्यक्ष रामदास दांगट पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला सर्व संचालक मंडळ व शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेत मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे वृत्तांत वाचून कायम करण्यात आले. तसेच ताळेबंद, नफा-तोटा पत्रक व लेखापरीक्षण अहवालास मान्यता देण्यात आली. दोष दुरुस्ती अहवाल पाठविण्याबाबतही निर्णय घेण्यात आला. यावेळी दिनदर्शिका छापणे, सभासदांना नफा वाटप करणे यासह विविध विषयांवर चर्चा करून मान्यता घेण्यात आली.
संचालक तुषार तरस व नरेंद्र सोनटक्के यांनी सोसायटीसमोरील अडचणींवर मार्गदर्शन केले. संचालक दिवाणजी भोंडवे, मनोहर भोंडवे व दिनकर कातळे यांनी आभार मानले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.