छोटा पडदा असो किंवा मोठा, मराठी असो किंवा हिंद, आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारे लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. त्याचं कारण म्हणजे त्यांचा नवा चित्रपट. १२ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'दशावतार' ने प्रेक्षकांची झोप उडवलीये. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवीन रेकॉर्ड केलाय. वयाच्या ८१ व्या वर्षी दिलीप प्रभावळकर या सिनेमात १० वेगवेगळ्या अवतारात दिसले. त्यांनी पाण्यातले सीनदेखील स्वतः केले. त्यांचा हा उत्साह अचंबित करणारा आहे. 'दशावतार' या सिनेमाने प्रदर्शनानंतरच्या ५ दिवसात तब्बल ६. ७ कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटात ते मालवणी भाषा बोलताना दिसतायत. मात्र त्यांना ही भाषा शिकावी लागली. ही भाषा शिकवणारादेखील त्यांच्यासोबत सेटवरच होता.
दिलीप प्रभावळकर हे कायम मुंबईत राहिले. ते स्वतःला मुंबईकर म्हणवतात. मात्र चित्रपटानिमित्त त्यांनी अनेकदा कोकणची वारी केलीये. मात्र या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी पहिल्यांदाच मालवणी भाषा शिकून घेतली. त्यांना मालवणी शिकवायला सेटवर खास माणूस बसवला होता. ही भाषा त्यांना दुसऱ्या कुणी नाही तर गीतकार गुरु ठाकूर यांनी शिकवली. गुरु ठाकूर हे कोकणातलेच आहेत. या सिनेमात त्यांचीही छोटीशी भूमिका आहे. याबद्दलचा एक किस्सा दिलीप प्रभावळकर यांनी एबीपीला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे.
View this post on InstagramA post shared by ZeeStudios (@zeestudiosmarathi)
या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले, 'दशावतार मध्ये याचा आणि माझा एक सीन आहे. खूप महत्त्वाचा सीन आहे तो. तो सीन सिनेमात कदाचित उशिरा दिसत असेल पण मी सेटवर गेल्यावर म्हणजे मी तिथे जे 50 दिवस शूटिंग केलं त्यातला पहिला सीन माझा गुरु ठाकूर सोबत होता. मुहूर्ताचा सीन गुरू सोबत होता. सिनेमात गुरुचा डॉक्टर असल्याचा रोल आहे. तो माझे डोळे तपासात होता, तो मला म्हणतो की बस करा... यापुढे दशावतार करू नका, निवृत्त व्हा. सिनेमात तो डॉक्टर म्हणून माझे डोळे तपासत होता आणि गुरु ठाकूर म्हणून प्रभावळकरांचं मालवणी तपासत होता.'
ते पुढे म्हणाले, 'एकाच वेळेला कॅरेक्टर आणि अॅक्टर दोघांनाही कामाला लावलेलं. गुरु ठाकूर हा मोर्चा कोकणातला असल्याने त्याला कोकणातली भाषा चांगली माहित आहे. उत्तम गाणी तर तो लिहितोच पण गेल्या काही काळातली त्याची गाणी पाहता कोकणी, मालवणी गाणी खूप सुपरहिट झाली. या सिनेमात सुद्धा त्याने महत्त्वाचे काम बजावले आहे. यावर गुरू ठाकूर म्हणाले की सिनेमाचं शुटिंग सुरू झालं तेव्हा 20 दिवस मला यांनी कोकणातच पकडून ठेवलेलं. दिलीप प्रभावळकर प्रत्येक डायलॉगनंतर दिग्दर्शकाआधी माझ्याकडे पाहायचे की मी
दीड वर्षही झालं नाही आणि झी मराठीची आणखी एक मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या भावुक पोस्टमुळे चर्चेला उधाण