Asia Cup 2025: राशिद खानची 'करामत'! भूवनेश्वर कुमारचा विक्रम मोडत केला मोठा पराक्रम; वाचा सविस्तर
esakal September 18, 2025 09:45 AM
  • आशिया कप २०२५ मध्ये बांगलादेशने अफगाणिस्तानला ८ धावांनी पराभूत केले.

  • पण या सामन्यात राशिद खानने टी२० आशिया कपमधील भूवनेश्वर कुमारचा विक्रम मोडला.

  • राशिद खानने या सामन्यात ४ षटकात २६ धावात २ विकेट्स घेतल्या.

आशिया कप २०२५ स्पर्धेत बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान संघात मंगळवारी (१६ सप्टेंबर) झालेला सामना रोमांचक झाला. अबुधाबीला झालेला हा सामना बांगलादेशने फक्त ८ धावांनी जिंकला. त्यामुळे अफगाणिस्तानला मोठा धक्का बसला. पण असं असलं तरी अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने मात्र या सामन्यादरम्यान मोठा वैयक्तिक विक्रम केला आहे. त्याने भारताच्या भूवनेश्वर कुमारचा विक्रम मोडला आहे.

Rashid Khan World Record: करामती खानने T20 मध्ये घडवला इतिहास! टॉप-२० मध्ये एकाही भारतीयाला स्थान नसलेल्या यादीत अव्वल

या सामन्यात बांगलादेशला २० षटकात ५ बाद १५४ धावांमध्ये अफगाणिस्तानने रोखले होते. यामध्ये नूर अहमद आणि राशिद खान यांनी चांगली गोलंदाजी केली होती. नूर अहमदने ४ षटकात २३ धावात २ विकेट्स घेतल्या, तर राशिद खानने ४ षटकात २६ धावात २ विकेट्स घेतल्या.

यामुळे आता टी२० आशिया कपच्या इतिहासात त्याच्या १० सामन्यांत १४ विकेट्स झाल्या आहेत. त्यामुळे आता तो टी२० आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने याबाबतीत भूवनेश्वरला मागे टाकले.

भूवनेश्वरने २०१६ आणि २०२२ मध्ये टी२० आशिया कप खेळताना ६ सामन्यांत १३ विकेट्स घेतल्या होत्या. सध्या सुरू असलेला आशिया कप २०२५ हा टी२० प्रकारातील तिसरा आशिया कप आहे. यापूर्वी २०१६ आणि २०२२ मध्ये टी२० प्रकारात आशिया कप खेळवण्यात आला आहे.

टी२० आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
  • १४ विकेट्स - राशिद खान (१० सामने)

  • १३ विकेट्स - भूवनेश्वर कुमार (६ सामने)

  • १२ विकेट्स - अजमल जावेद (७ सामने)

  • १२ विकेट्स - वनिंदू हसरंगा (८ सामने)

  • १२ विकेट्स - हार्दिक पांड्या (१० सामने)

अफगाणिस्तानचा पराभव

दरम्यान बांगलादेशने तान्झिद हसनच्या ५२ धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानसमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचे फलंदाज बांगलादेशी गोलंदाजांसमोर संघर्ष करताना दिसले.

अफगाणिस्तानला अखेरच्या षटकात पराभवाचा धक्का बसला. त्यांना २० षटकात सर्वबाद १४६ धावाच करता आल्या.

Rashid Khan: सुरुवातीच्या विकेट्स गमावल्यानंतर अफगाणिस्तानला सुधारणा करण्याची आवश्यकता : राशीद खान

अफगाणिस्तानकडून अझमतुल्ला ओमरझाईने १६ चेंडूत ३० धावांची खेळी केली. तसेच कर्णधार राशिद खानने ११ चेंडूत २० धावा केल्या. तसेच रेहमनुल्ला गुरबाजने ३५ धावा केल्या. पण कोणालाही मोठी खेळी करून संघाला विजयापर्यंत पोहचवता आले नाही.

बांगलादेशकडून गोलंदाजी करताना मुस्तफिजूर रेहमानने ३ विकेट्स घेतल्या, तर रिषाद हुसैन, नसुम अहमद आणि तस्किन अहमद यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

FAQs

प्रश्न १: आशिया कप २०२५ मधील बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान सामना कोणी जिंकला?

उत्तर: बांगलादेशने हा सामना ८ धावांनी जिंकला.

(Who won the Bangladesh vs Afghanistan Asia Cup 2025 match? – Bangladesh won by 8 runs.)

प्रश्न २: राशिद खानने किती विकेट्स घेतल्या?

उत्तर: राशिद खानने ४ षटकांत २६ धावांत २ विकेट्स घेतल्या.

(How many wickets did Rashid Khan take? – He took 2 wickets for 26 runs in 4 overs.)

प्रश्न ३: राशिद खानचा विक्रम काय आहे?

उत्तर: राशिद खान टी२० आशिया कपमध्ये १४ विकेट्ससह सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.

(What is Rashid Khan’s record? – He became the highest wicket-taker in T20 Asia Cup with 14 wickets.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.