राजनाथ सिंह यांचे वक्तव्य : ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
सर्कल संस्था/हैदराबाद
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाक संघर्ष रोखण्यासाठी हस्तक्षेप केल्याचा दावा फेटाळला आहे. दहशतवाद्यांच्या विरोधातील कारवाई कुठल्याही त्रयस्थच्या मध्यस्थीमुळे रोखण्यात आली नव्हती असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट पेले. भविष्यात जर कुठलाही दहशतवादी हल्ला झाला, तर ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरू होणार असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हैदराबाद मुक्ती दिन सोहळ्याला संबोधित करताना म्हटले आहे.
भारत आणि पाकिस्तानातील संघर्ष हा द्विपक्षीय मुद्दा असून यात त्रयस्थाचा हस्तक्षेप मान्य नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले आहे. भारत-पाकिस्तान दरम्यान संघर्षविराम कुणाच्या हस्तक्षेपामुळ झाला असा सवाल काही लोक करत आहेत. दहशतवाद्यांच्या विरोधात अभियान कुणाच्या हस्तक्षेपामुळे रोखण्यात आले नव्हते असे मी स्पष्ट करू इच्छितो असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
भारत-पाकिस्तानातील संघर्ष रोखल्याचा दावा काही जण करतात. परंतु कुणीच असे केलेले नाही. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि विदेशमंत्री मोहम्मद इशाक डार यांनीही भारताने याप्रकरणी त्रयस्थाची भूमिका फेटाळल्याचे स्पष्ट केले असल्याचा उल्लेख राजनाथ सिंह यांनी केला.
काय बोलले इशार डार?
अज जजिरा या वृत्तवाहिनीने डार यांना त्रयस्थाच्या हस्तक्षेपाबद्दल प्रश्न विचारला होता. यावर डार यांनी त्रयस्थाच्या हस्तक्षेपाबद्दला पाकिस्तानला समस्या नाही, परंतु भारताने हा द्विपक्षीय मुद्दा असल्याचे स्पष्ट केले असल्याचे उत्तर दिले होते. द्विपक्षीय मुद्दा असल्याबद्दल आम्हाला कुठलीच समस्य नाही, परंतु व्यापक चर्चा व्हायला हवी. यात दहशतवाद, व्यापार, अर्थव्यवस्था आणि जम्मू-काश्मीर या सर्व विषयांवर चर्चा व्हायला हवी असे डार यांनी म्हटले होते.
अमेरिकेलाही भारताने कळविले
10 मे रोजी अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो यांच्याकडून संघर्षविरामाचा प्रस्ताव माझ्याकडे आला. लवकरच भारत आणि पाकिस्तानदमयान स्वतंत्र व्यासपीठावर चर्चा होईल असे मला सांगण्यात आले. याबद्दल आम्ही 25 जुलै रोजी वॉशिंग्टनमध्ये रुबियो यांना चर्चेचे काय झाले असे विचारले होते. यावर रुबियो यांनी हा द्विपक्षीय मुद्दा असल्याचे भारताचे म्हणणे असल्याचे स्पष्ट केले होते. जर कुठलाही देश चर्चा करू इच्छित असेल तर आम्ही स्वागत करतो असे डार यांनी मुलाखतीत स्पष्ट केले.