पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भगवद गीतापाठ महायज्ञ
पनवेल, ता. १७ (प्रतिनिधी) ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष, संस्कार भारती, संस्कृत भारती यांच्या वतीने श्रीगुरुकुलम् न्यासतर्फे श्रीमद् भगवद गीता पाठ महायज्ञ उत्साहात पार पडला. धार्मिक वातावरणात गीतेच्या श्लोकांचे पठण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्यासाठी, देश, राज्य व समाजाच्या कल्याणासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. या महायज्ञाचे आयोजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.
विरुपाक्ष मंगल कार्यालय येथे बुधवारी (ता. १७) श्रीमद् भगवद् गीता पाठ महायज्ञ पार पडले. एकाच वेळी दोनशेहून अधिक जणांनी एकत्र येऊन श्रीमद् भगवद् गीतेतील सर्व श्लोकांचे लयबद्ध पठण करून गीतेच्या ज्ञानाचा अनुभव घेतला. सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गीतेच्या श्लोकांमध्ये सहभाग नोंदवला. यज्ञस्थळी मंत्रोच्चार आणि वेदघोष यामुळे परिसरात एक पवित्र व अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. यावेळी प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ॲड. प्रकाश बिनेदार, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, माजी शहराध्यक्ष अनिल भगत, जयंत पगडे, गुरुकुलम न्यास अध्यक्ष मंजिरी फडके, संस्कार भारतीच्या जुईली चव्हाण, संस्कृत भारतीच्या अनया करंदीकर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोर्चा, युवा मोर्चा यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.