Rahul Gandhi on Vote Chori : कर्नाटकात 6018 नाव वगळली, महाराष्ट्रात 6850 जोडली, पण मतदारांचा थांगपत्ता नाही, राहुल गांधींचा वोटर लिस्टमधील गडबडीचा तो मोठा दावा
Tv9 Marathi September 18, 2025 08:45 PM

Rahul Gandhi on Election Commission of India : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षाला मत चोरी प्रकरणात घेरले. राहुल गांधी यांनी गुरुवारी 18 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली. ते हायड्रोजन बॉम्ब फोडणार असं सांगण्यात येत होते. पण त्यांनी गेल्यावेळीप्रमाणेच काही उदाहरणं देत मत चोरीचा पॅटर्न, त्यासाठी मोठे सॉफ्टवेअरचा वापर होत असल्याचा इतकेच नाही तर कॉल सेंटरमधून ही प्रक्रिया राबवण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. मत चोरी प्रकरणात मी जो काही दावा करत आहे. तो मोठ्या जबाबदारीने करत आहे. माझ्याकडे भक्कम पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला. इतकेच नाही तर यावेळी त्यांनी काही मतदारांना सुद्धा मंचावर उभं करत निवडणूक आयोगासमोर आव्हान उभं केलं.

हा हायड्रोजन बॉम्ब नाही

राहुल गांधी म्हणाले की अगोदरच सांगतो की हा काही हायड्रोजन बॉम्ब नाही. हायड्रोजन बॉम्ब लवकरच पडेल. या देशातील तरुणांसमोर ही उदाहरणं समोर आणत आहे. त्यांना मत चोरी कशी करण्यात आली, निवडणुकीत कशी गडबड करण्यात आली हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे.

कर्नाटकात 6018 नाव वगळली, महाराष्ट्रात 6850 जोडली

कर्नाटकातील अलंद या मतदार संघाचे त्यांनी उदाहरण दिलं. कोणीतरी 6018 मतदारांची नाव वगळली. 2023 मधील निवडणुकीत अलंद या मतदारसंघातून किती मतदार हटवण्यात आले हे आम्हाला माहिती नाही. ही संख्या 6018 पेक्षा अधिक आहे. पण ही नाव हटवताना योगायोगाने काही जण पकडल्या गेले. तिथल्या बुथ लेव्हल अधिकाऱ्याला त्याच्या काकाचे नाव हटविल्याचे लक्षात आले. तेव्हा त्याने त्याचा तपास घेतला. त्याने त्याच्या शेजाऱ्याकडे चौकशी केली. तेव्हा त्याने आपण असा कोणताही अर्ज केला नसल्याचे सांगितले. म्हणजे ज्याने मतदाराचे नाव वगळण्याची मागणी केली आणि ज्याचे मतदार यादीतून नाव गायब झाले त्या दोघांनाही हा प्रकार माहिती नव्हता. कोणत्या तरी बाहेरील शक्तीने ही प्रक्रिया हायजॅक केली आणि मतदारांची नाव यादीतून वगळली.

तर विदर्भातील राजुरा विधानसभा मतदार संघात 6850 मतदारांची नाव जोडण्यात आली. त्यांचा काहीच थांगपत्ता नसल्याचे ते म्हणाले. कोणती तरी यंत्रणा, अत्याधुनिक सॉफ्टवेअर वापरून हा प्रकार करण्यात आल्याचा. त्यासाठी कॉल सेंटरचा वापर झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

निवडणूक आयुक्त वोटचारांना वाचावतायत

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हा सर्व प्रकार माहिती आहे. ते वोटचोराना वाचवत असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. या मत चोरट्यांनी भारतीय लोकशाही संपवली आहे. पण एक लहान चूक झाली तरी चोरी पकडली जाते असा दावा त्यांनी केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.