पंचांग -
गुरुवार : भाद्रपद कृष्ण १२, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.१५ सूर्यास्त ६.२६, चंद्रोदय पहाटे ३.४८, चंद्रास्त दुपारी ४.२८, गुरुपुष्यामृत सूर्योदयापासून ६.३३ प., द्वादशी श्राद्ध, सन्यासिनां महालय, भारतीय सौर भाद्रपद २७ शके १९४७.
दिनविशेष -
२०१० - भारताची अव्वल महिला मुष्टियुद्ध खेळाडू एम. सी. मेरी कोम हिने सलग पाचव्यांदा जागतिक सुवर्णपदकाची कमाई करून ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली.
२०१५ - अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था (नासा)ने प्लुटोची नवी छायाचित्रे प्रसिद्ध केली.
२०१६ - पुण्याच्या प्रियेशा देशमुखने मूकबधिरांच्या पहिल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.