Singer Kumar Sanu: बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक कुमार सानू यांचं खासगी आयुष्य कायमच चर्चेत राहिलं आहे. अफवा आणि आरोपांमुळे कुमार सानू यांना अनेकदा ट्रोल देखील करण्यात आलं. पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट, दोन अभिनेत्रींसोबत अफेअर आणि दुसरं लग्न याबद्दल कुमार सानू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. दमरम्यान, सध्या ‘बिग बॉस 19’ मधील स्पर्धक आणि अभिनेत्री कुनिका सदानंद हिने देखील कुमार सानू यांचं नाव न घेता लिव्हइन रिलेशनशिपमध्ये असताना त्यांनी फसवणूक केल्याचा आरोप केला. ज्यानंतर पुन्हा कुमार सानू यांचं खासगी आयुष्य तुफान चर्चेत आलं.
कुमार सानूयांनी पहिलं लग्न रिटा भटाचार्य यांच्यासोबत केलं. दोघांना तीन मुलं आहेत. पण त्यांचं नातं फार काळ काही टिकलं नाही, अखेर 1994 मध्ये कुमार सानू आणि रिटा यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर पहिल्या पत्नीची फसवणूक केल्याचे आरोप कुमार सानू यांच्यावर करण्यात आले. तेव्हा कुमार सानू यांचं अफेअर अभिनेत्री मिनाक्षी शेषार्दी हिच्यासोबत असल्याची चर्चा रंगली होती.
अफेअरमुळे दोघांचं नातं तुटलं… अशा देखील अफवा पसरल्या. पण कुमार सानू यांनी सर्व अफवा फेटाळल्या आणि मिनाक्षी आणि माझ्यात कधीच प्रेमसंबंध नव्हते असं सांगितलं… दरम्यान एका मुलाखतीत कुमार सानू यांना खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं.
मिनाक्षी हिच्यामुळे गायकाचं पहिलं लग्न असे आरोप करण्यात आलं. यावर कुमार सानू म्हणाले, मुलाखतीत कुमार सानू म्हणाले होते, ‘मिनाक्षी आणि माझी कधी ओळख झालीच नाही… पण तरी देखील अफवा पसरल्या. मी स्त्रीलंपट आहे हे वाक्य अनेकदा ऐकलं… जर मी खरंच स्त्रीलंपट असतो तर, दुसऱ्या लग्नानंतर देखील अशा अफवा पसरल्या असत्या…
‘मी स्त्रीलंपट आहे… असं अनेकदा ऐकलं आहे. सलोनी हिच्यासोबत माझं दुसरं लग्न झालं आणि आमच्या लग्लाना 23 वर्ष झाली आहे…’ सांगायचं झालं तर, पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर कुमार सानू यांनी सलोनी भटाचार्य यांच्यासोबत लग्न केलं. त्यांना आता दोन मुली देखील आहे.