बालाजी सुरवसे
धाराशिव : मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकणी पूरस्थिती आहे. अशात गाव चोही बाजूने पुराच्या पाण्याने वेढलेले असतात महिलेला अचानक प्रस्तुत वेदना सुरु झाल्या. यामुळे काही पर्याय नसल्याने गर्भवतीला सहा फूट पुराच्या पाण्यातून तराफ्यावर बाहेर काढण्याचा प्रकार समोर आला आहे. तात्काळ उपचार मिळाल्याने महिला व नवजात शिशु सुखरूप आहेत.
राज्यात मुसळधार पावसाचे थैमान सुरु आहे. सर्वच भागात जोरदार पाऊस होत असल्याने अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. घरांमध्ये पाणी शिरले आहे; तर कोठे संपूर्ण गावाला पाण्याचा वेढा पडलेला आहे. यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. धाराशिवजिल्ह्यात देखील हीच परिस्थिती पाहण्यास मिळत असून जिल्ह्यातील वागेगव्हान रात्रीच्या सुमारास प्रसूतीसाठी महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागल्याचे पाहण्यास मिळाले.
Maval : शेतकऱ्यावर रिंग रोड आणि टीपी योजनेचे संकट; मावळमधील शेतकरी आक्रमक, शेतीची जागा देण्यास नकारप्लास्टिकच्या दोन बॅरलचा बनविला तराफा
दरम्यान बाळंतपणासाठी महिला माहेरी वागेगव्हान गावाला आली होती. जोरदार पावसामुळे गावाला पाण्याचा वेढा पडलेला आहे. अशात मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास महिलेच्या पोटात दुखू लागले. पुराचे पाणी असल्याने येतुन नेण्यासाठी कोणतेही साधन नव्हते. पर्याय म्हणून पाण्याचे प्लास्टिकचे दोन टिप (बॅरल) बांधून त्यावर बाज ठेवून तराफा बनवण्यात आला. त्या गर्भवती महिलेला त्यावर बसवून पाण्यातून बाहेर काढले व सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील रुग्णालयात दाखल केले.
Nagpur Medical Collage : लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात शिरले घाण पाणी; नागपूरच्या मेडिकल रुग्णालयातील प्रकारमहिला व नवजात बाळ सुखरूप
पुराच्या पाण्यातून बाहेर काढून कुर्दुवाडीला दवाखान्यात पोहोचवले. दवाखान्यात तिची प्रसूती झाली असून तिच्या पोटी पुत्ररत्न आले. राधाचे पिंपळखुटे (ता. माढा) हे सासर आहे. त्यामुळे तिच्यावर कुर्दुवाडीत उपचार सुरू आहेत. ना कुठली आपत्कालीन व्यवस्था ना कुठला प्रशासन गावातील तरुणांनी व गावकऱ्यांनी एकत्र येत, हा सगळा कारनामा केला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जाम व्हायरल होत आहे.