Old Vehicles : जुनं वाहन खरेदी किंवा विक्री करताय तर थांबा! पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले 'हे' आदेश वाचा
Sarkarnama September 19, 2025 06:45 AM

Old Vehicles : Pune News : राज्यात सर्वत्र जुन्या वाहनांची खरेदी-विक्री सर्रासपणे केली जाते. अगदी सोशल मीडियावर जाहिरात टाकून देखील आपलं वाहन एखाद्या त्रयस्थ व्यक्तीला विकण्यात येतं. तसंच शहरात अनेक एजंट देखील वाहन खरेदी-विक्रीचे व्यवहार करून देतात. मात्र या व्यवहारांमुळं गुन्ह्याच्या उकल होण्यास अडचण येत निर्माण होत आहेत, त्यामुळं पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहेत.

Pune Gun Fire: कोथरुडमध्ये गुंडांचा हैदोस! तीन गोळ्यांनी जखमी झालेल्या प्रकाश धुमाळ यांनी सांगितली आपबिती

पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये जुनी वाहनं खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी त्यांच्याकडून होणाऱ्या वाहन खरेदी-विक्री संदर्भातील संपूर्ण माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला देणं बंधनकारक राहील, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केले आहेत. संबंधित व्यावसायिकांनी माहिती न दिल्यास त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम २२४ अन्वये कारवाई करण्यात येईल, असंही आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे.

Supreme Court: मुलीच्या लग्नासाठी वडील आपली संपत्ती विकू शकतात! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

दरम्यान, ग्रामीण भागामध्ये वाढत्या नागरी वसाहतींमुळं जुन्या मोटारसायकली व इतर वाहनांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. परंतू, याबाबत योग्य तपशील न ठेवल्यामुळं चोरीच्या वाहनांची खरेदी-विक्री होण्याची शक्यता वाढत असून गुन्ह्यांच्या उघडकीस येण्यास अडथळा निर्माण होत आहे, या पार्श्वभूमीवर हे आदेश पुढील दोन महिन्यांसाठी लागू राहणार आहेत.

Jayant Patil News: जयंत पाटलांचा शरद पवारांविषयी मोठा दावा; म्हणाले,' राज्यातील लोकांना सरकारपेक्षा...

व्यावसायिकांनी खरेदी-विक्री होणाऱ्या वाहनांचा क्रमांक, इंजिन व चासी क्रमांक, मूळ मालकाचे नाव व संपूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक, ओळखपत्र, वाहनांचे आरसी, टीसी पुस्तक, तसेच खरेदीदाराचे नाव, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक व ओळखपत्र यासह तपशीलवार माहिती संकलित करून दर ७ दिवसांनी संबंधित पोलीस ठाण्याला सादर करणं आवश्यक राहील, असंही आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.