सागर निकवाडे
नंदुरबार : किरकोळ वादातून मार्केट परिसरात भररस्त्यावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना नंदुरबार शहरात घडली होती. या घटनेतील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून याचे पडसाद नंदुरबार शहरात उमटत आहेत. नंदुरबार शहरात सध्या तणावाचे वातावरण असून सकाळपासून दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. तर पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे.
नंदुरबारशहरातील मार्केट परिसरात मंगळवारी सायंकाळी भररस्तात चाकू हल्ला करण्यात आलेल्याजय वळवी यांचा उपचारादरम्यान सुरत येथे मृत्यू झाला. मंगळवारी किरकोळ वादातून सिंधी कॉलनी परिसरात भैय्या मराठे नामक युवकाने त्याच्यावर चाकुने प्राणघातक हल्ला केला होता. यानंतर त्याला खाजगी रुग्णालायत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला उपचारासाठी सुरत येथे हलविण्यात आले होते.
Badlapur Crime : गावगुंडाकडून पोळीभाजी केंद्राची तोडफोड; बदलापुरातील धक्कादायक प्रकारमारेकरीला घेतले ताब्यात
मात्र सुरत येथे उपचार सुरु असताना आज त्यांची प्राणज्योत मालावली आहे. दरम्यान चाकू हल्ल्याची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैदी झाली आहे. पोलीसांनी या हल्यातील मुख्य आरोपी भैय्या मराठे याला ताब्यात घेवून त्याला न्यायालयासमोर हजर केले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु करण्यात येत आहे.
PMPML : श्री क्षेत्र देहू- भंडारा डोंगर बससेवेचा शुभारंभ; दिवसभरात मारणार सात फेऱ्याशहरात तणावाचा वातावरण
जय वळवीच्या मृत्यूमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये; यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात सध्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे.