swt1717.jpg
92191
चौके ः ग्रामपंचायतीत आयोजित विशेष ग्रामसभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
चौके येथील ग्रामसभेमध्ये
ग्रामस्थांना योजनांचे धडे
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १८ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आज तालुक्यातील चौके ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली. या सभेला तहसीलदार वर्षा झालटे यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने हजेरी लावल्याने ही ग्रामसभा यशस्वी ठरली. यावेळी १३२ ग्रामस्थ उपस्थित होते.
तहसीलदार झालटे यांनी ग्रामपंचायतीच्या विविध योजना आणि शासनाच्या नवनवीन उपक्रमांची माहिती दिली. या योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामस्थांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी निरीक्षक म्हणून जिल्हा परिषद बांधकाम मालवणचे अभियंता नितीन पवार, महसूल अधिकारी पी. जी. गुरव, सरपंच पी. के. चौकेकर, तंटामुक्ती अध्यक्ष नितीन गावडे, पोलिसपाटील रोहन चौकेकर, ग्रामपंचायत अधिकारी श्री. सरमळकर, संतोष गावडे, ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, कृषी सहायक कु. खोत, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, सीआरपी श्रावणी गावडे, ग्रामसंघ अध्यक्ष, बचतगट प्रतिनिधी आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. या सभेमुळे शासकीय यंत्रणा आणि ग्रामस्थ यांच्यात संवाद साधला गेला. उपस्थित मान्यवरांनी आणि ग्रामस्थांनी या अभियानाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.