बॉलिवूडचा किंग खान असलेल्या शाहरुखचा मुलगा आर्यन खान याने नुकतंच सिनेसृष्टीत पदार्पण केलंय. त्याने दिग्दर्शित केलेली सीरिज ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ आज १८ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आलीये. मात्र त्यापूर्वी बुधवारी संध्याकाळी या सीरिजचा प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता. या प्रिमिअरला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र यासगळ्यात एका खास व्यक्तीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ती व्यक्ती म्हणजे आर्यन खानची कथित गर्लफ्रेंड लारिसा बोन्सी. तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
आर्यन खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतो. क्रूझवरील ड्रग प्रकरणानंतर तो चांगलाच चर्चेत आला होता. त्याच्या खासगी आयुष्याची कायमच चर्चा होते. त्याच्या आणि लारिसाच्या नात्याचीही जोरदार चर्चा रंगली होती. आता त्या चर्चा खऱ्या ठरताना दिसत आहेत. आर्यांच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ सीरिजच्या स्क्रिनिंगसाठी देखील लारिसा पोहोचली होती. तिने पापाराझींना पोज देखील दिली. सध्या लारीसाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापूर्वीही लारिसा आणि आर्यन अनेक ठिकाणी एकत्र दिसलेत.
View this post on InstagramA post shared by Viral Bhayani (@viralbhayani)
न्यू ईयर पार्टी दरम्यान देखील दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. लारिसा ब्राझिलियन अभिनेत्री आणि मॉडेल देखील आहे. लारिसा हिने अभिनेता अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम यांच्यासोबत देखील काम केलं आहे. ‘देसी बॉयस’ सिनेमातील ‘सुबह होने न दे’ गाण्याच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. शिवाय लारिसा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. तर दुसरीकडे आर्यनच्या या सीरिजचंदेखील सोशल मीडियावर कौतुक होताना दिसतंय.
'दशावतार'चा बॉक्स ऑफिसवर धुरळा! वीक डे असूनही छप्परफाड कमाई; ६ दिवसात कमावले तब्बल इतके कोटी