Rahul Gandhi Hydrogen Bomb : 'त्या' नंबरवर ओटीपी आला अन्... , राहुल गांधींचा मोठा खुलासा, हा हायड्रोजन बाॅम्ब नाही!
Sarkarnama September 19, 2025 09:45 AM

Rahul Gandhi News : राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मत चोरीविषयी मोठा खुलासा केला. ते म्हणाले हा हायड्रोजन बाॅम्ब नाही, हायड्रोजन बाॅम्ब येणार आहे. या देशातील युवकांना हे दाखवण्याचा आणि समजावून सांगण्याचा आहे की निवडणुकांमध्ये कशाप्रकारे गैरव्यवहार केला जातोय. दलित, आदिवासी, ओबीसींची नावे मतदारयादीतून डिलिट केली जात आहेत. माझ्याकडे 100 टक्के पुरावे आहेत.

राहुल गांधीम्हणाले, 'कर्नाटकमधील आळंद हा एक मतदारसंघ आहे. तिथे कोणीतरी 6018 मतं हटवण्याचा प्रयत्न केला. 2023 च्या निवडणुकीत अळंदमध्ये एकूण किती मतं हटवली गेली हे आम्हाला माहित नाही. पण योगायोगाने कोणीतरी 6018 मतं हटवताना पकडला गेला.'

'तिथल्या बूथ लेव्हल अधिकाऱ्याचंया काकांचं मत डिलिट करण्यात आलं. त्याने चौकशी केली की हे मत कोणी हटवलं, तर त्याला आढळलं की हे मत हटवणारा त्याचा शेजारी होता. त्याने शेजाऱ्याला विचारलं, पण त्याने सांगितलं की मी कुठलंही मत हटवलं नाही. ना मत हटवणाऱ्या व्यक्तीला माहिती होती, ना ज्याचं मत काढलं गेलं त्याला माहिती होती. कुठल्या तरी दुसऱ्याने ही प्रक्रिया हायजॅक केली आणि मत हटवलं.', असे देखील त्यांनी सांगितले.

Manoj Jarange Patil: आता कसली भूमिका? जरांगे पाटील यांना सरकारने सर्व काही दिले!

राहुल गांधी म्हणाले, नागराज नावाच्या व्यक्तीचे दोन फॉर्म भरले गेले आणि दोन्ही फॉर्म 36 सेकंदांच्या आत भरले गेले. फॉर्म भरण्यासाठी कोणीतरी दुसऱ्या राज्यातून फोन घेऊन आला होता आणि ते फॉर्म त्याच फोनवरून भरले गेले आहेत. सॉफ्टवेअरने बाहेरील फोन नंबर वापरून ओटीपीद्वारे मतदार यादीतून नावे हटवण्यात आली. सूर्यकांत नावाच्या व्यक्तीने 14 मिनिटांत 12 मतदार डिलीट करण्याचे अर्ज भरले. कर्नाटक सीआयडीने या विषयी गुन्हा देखली दाखल केला. महाराष्ट्रताली राजुरी मतदारसंघात देखील सहा हजार मतं वाढली. हरियाणा, महाराष्ट्र, कर्नाटक, युपीमध्ये असे घडले आहे.

Rahul Gandhi Hydrogen Bomb : राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बाॅम्ब'आधीच काँग्रेसचा व्हिडिओ, भाजपचे टेन्शन वाढले!
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.