अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या पतधोरण समितीने व्याजदरात 0.25 टक्क्यांची कपात केली आहे. बुधवारी सोन्याने नवीन रेकॉर्ड केला. पण वायदे बाजाराच्या सत्राच्या अखेरीस ते घसरले. सोने जागतिक बाजारात $3,707.57/oz अशा सर्वकालीन उच्चांकावर पोहचले होते. पण फेडचे अध्यक्ष पॉवेल यांच्या पुन्हा दर कपातीच्या वक्तव्यानंतर दोन्ही धातुना कापरे भरले. गुरुवारी सोने एक टक्का घसरून 3690 डॉलर प्रति औसपर्यंत घसरले. तर चांदीत तितकीच घसरण होऊन ती 42 डॉलर प्रति औसपर्यंत खाली आले. पण सोन्याने 1980 नंतर पहिल्यांदाच असा रेकॉर्ड केला आहे.
सोन्याने काय केला तो रेकॉर्ड?
Gold ने 45 वर्षांतील रेकॉर्ड तोडला 2025 या वर्षात सोने आतापर्यंत 40 टक्क्यांसह उसळले आहे. S&P 500 सारख्या मोठ्या इंडेक्सला सुद्धा सोन्याने मागे टाकले आहे. 1980 मधील इन्फ्लेशन ॲडजेस्ट रेकॉर्डला पण सोन्याने मागे टाकले आहे. सोने या काळात तळपले आहे. ज्यांनी सोन्यात गेल्या पाच वर्षांपासून गुंतवणूक सुरू केली आहे. त्यातील काही जण लखपती, करोडपती आणि अब्जाधीश झाले आहेत.
सोन्याची किंमत किती?
goodreturns.in नुसार, 17 सप्टेंबर रोजी 1 ग्रॅम 24 कॅरेट सोने 54 रुपयांनी घसरले आता सोन्याचा भाव 11,117 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 10,190 रुपये आहे. तर 18 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याचा भाव 8,338 रुपये इतके आहे.
चांदीत मोठी घसरण
गेल्या आठवड्याच्या अखेरीस चांदीने 3 हजारांची उसळी घेतली होती. तर या आठवड्याच्या सुरुवातीला 15 सप्टेंबर रोजी चांदीत कोणताही मोठा बदल दिसला नाही. 16 सप्टेंबर रोजी एक हजारांची दरवाढ झाली होती. तर आज सकाळच्या सत्रात किंमतीत घसरण दिसली. तर 17 सप्टेंबर रोजी 2000 रुपयांची घसरण झाली. तर आज सकाळी एक हजारांची पडझड दिसत आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,31,000 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने आणि चांदीचा भाव घसरला आहे. 24 कॅरेट सोने 1,09,730 रुपये, 23 कॅरेट 1,09,290, 22 कॅरेट सोने 1,00,520 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 82,300 रुपये, 14 कॅरेट सोने 64,190 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,25,756 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.