देशभरात सध्या नूपुर बोरा या महिला अधिकाऱ्याची चर्चा होत आहे. या अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराने प्रशासन चक्रावून गेले आहे.
नूपुर बोरा ही ३६ वर्षांची महिला आसाम प्रशासनातील अधिकारी आहे. एप्रिल २०१९ पासून ती महसूल सेवेत रुजू झाली आणि सहा वर्षांतच कोट्यावधी रुपयांची माया जमवली आहे.
नुपूर बोरा हिच्या घरी छापेमारी केल्यानंतर तब्बल एक कोटी रुपयांचे दागिने आणि जवळपास तेवढीच रोकड सापडली आहे. तपास अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना धक्का बसला आहे.
सर्कल अधिकारी असताना नुपूर यांनी अवैधपणे केलेल्या जमीन व्यवहारातून कोट्यावधी रुपये कमावल्याचा संशय आहे. याबाबत आणखी तपास सुरू आहे. नुपूरला पोलिसांनी अटक केली आहे.
नूपुर यांनी प्रामुख्याने हिंदूंच्या जमिनींचे व्यवहार केल्याचे आढळून आले आहेत. या जमिनी एका विशिष्ट धर्मातील लोकांना विकल्याचेही तपासात समोर आले आहे.
सरकारी नोकरीत येण्यापूर्वी नूपुरने सरकारी हायस्कुलमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होती. दोन वर्षे ती डाएट या संस्थेतही शिक्षिका म्हणून कार्यरत होती.
सहा वर्षांपुर्वी महसूल विभागात निवड. सहायक आयुक्त म्हणून पहिली पोस्टिंग मिळाली. जून २०२३ मध्ये बारपेट जिल्ह्यात सर्कल अधिकारी म्हणून बदली झाली. सध्या कामरुप जिल्ह्यात सर्कल अधिकारी.
बारपेटमधून बदली केल्यानंतर सर्व प्रकार उजेडात आला. बारपेटमध्ये मुस्लिमांची संख्या अधिक आहे. बोरा यांनी हिंदूंच्या जमिनी मुस्लिमांना हस्तांतरित करत पैसा कमावल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.