Crop Damage: जिल्ह्यातील २२२ गावांना अतिवृष्टीचा तडाखा; ५८ हजार ४९९ हेक्टवरील पिके पाण्यात, पाच तालुक्यांत मोठे नुकसान
esakal September 19, 2025 11:45 AM

बुलडाणा : सप्टेंबरच्या मध्यावर झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील शेतीला मोठा फटका बसला आहे. ता. १५ व १६ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टी, अतिपाऊस आणि ढगफुटीसदृश पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल २२२ गावे बाधित झाली असून, ११ महसूल मंडळांतील पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालातून स्पष्ट झाले आहे.

या आपत्तीमुळे अंदाजे ५८ हजार ४९९ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, कापूस व इतर पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. सर्वाधिक पाऊस मलकापूर तालुक्यात मलकापूर तालुक्यातील जांभूळधाबा मंडळाने तब्बल १७६.३ मिमी पावसाची नोंद केली. त्याचप्रमाणे सिंदखेड राजा व तुळजापूर (देऊळगाव राजा) मंडळात प्रत्येकी १५१.८ मिमी पाऊस झाला.

यामुळे शेतजमिनींवर पाणी साचून सोयाबीन व कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले. मलकापूर तालुक्यात २४ तासांत सरासरी १०२.३ मिमी पाऊस नोंदविला गेला. मलकापूर तालुक्यातील ७८ गावांना फटका दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मलकापूर तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. तालुक्यातील ७८ गावांमधील ३६ हजार ५८५ हेक्टरवरील सोयाबीन आणि कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तसेच देउळगाव राजा तालुक्यातील सहा हजार ३९६ हेक्टवरील सोयाबीन व भाजीपाला, सिंदखेड राजा तालुक्यातील ५४ गावातील १५ हजार २३३ हेक्टरवरील पिके पाण्यात गेली आहेत. तसेच नांदुरा तालुक्यातील १७ गावे, २२५ हेक्टवरील पिके, बुलडाणा तालुक्यातील पाच गावातील ४५ हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत. शेगाव तालुक्यातील चार गावातील १५ हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले.

Monsoon Flood: शेतात फक्त पाणीच पाणी; साहेब, आता सगळं संपलं, भूमचे शेतकरी झाले हवालदिल पावसाचा तडाखा बसलेली मंडळे

चिखली तालुका : पेढ (६९ मिमी), देऊळगाव राजा तालुका : तुळजापूर (१५१.८ मिमी), अंढेरा (६८.५ मिमी), सिंदखेड राजा तालुका : सिंदखेड राजा (१५१.८ मिमी), किनगाव राजा (६९.८ मिमी), दुसरबीड (६५.५ मिमी), मलकापूर तालुका : मलकापूर (१२३.५ मिमी), नरवेल (७९.३ मिमी), धरणगाव (७९.३ मिमी), जांभूळधाबा (१७६.३ मिमी) आणि मोताळा तालुका : रोलापूर (६८.८ मिमी) सुदैवाने या आपत्तीत जीवितहानी झालेली नाही. पण सोयाबीन, कापूस या मुख्य पिकांना मोठा फटका बसला असून, काही फळपिकेही बाधित झाली आहेत. शेती नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.