Solapur News: 'पुरामुळे संसारच नव्याने थाटण्याची वेळ'; सीनामाईच्या पाण्याने पिकांसह सौरपंपही गेले वाहून
esakal September 19, 2025 11:45 AM

पोथरे : सीना नदीला आलेल्या महापुराने येथील शेती उद्ध्वस्त झाली आहे. उसाच्या पिकासह लिंबोणी, तूर, मका, कांदा पिके वाहून गेली. विद्युत पंप व नुकत्याच उभा केलेले सौरपंप वाहून गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना संसारच नव्याने थाटण्याची वेळ आली आहे. या नुकसानीचे प्रशासनाकडून पंचनामे सुरू असून, शेतकऱ्यांमधून शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे.

Success Story:'विशाल केंजळेंची एमपीएससीमधून यशाला गवसणी'; जिद्दीच्या जाेरावर ११ वेळा सरळसेवा परीक्षेत सुयश, आई-वडिलांचे स्वप्न केलं पूर्ण

सीना नदीला ५६ वर्षानंतर महापूर आला. या महापुरात करमाळा तालुक्यातील नदीकाठच्या दहा गावातील शेतीला मोठा फटका बसला आहे. आळजापूर, बिटरगाव श्री, बाळेवाडी, या गावांना सर्वात जास्त फटका बसला आहे. नदीपात्राच्या बाहेर पाण्याला प्रचंड वेग असल्याने शेतातील ऊस पडून त्यावरती चिखल आला. अनेक शेतकऱ्यांचाऊस पाण्याच्या वेगाने वाहून गेला. बिटरगाव व बाळेवाडी येथील लिंबोणीच्या फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. नुकतेच बसवलेले सौरपंप वाहून गेले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मातीही, कांदा, मका, उडीद, तूर वाहून गेली आहे.

खडकी येथील शिंदे, खरात वस्तीवरील व निलज येतील भोई वस्तीवर शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरल्याने अन्नधान्य, कपडे, इलेक्ट्रिक वस्तू पूर्णतः खराब झाल्या आहेत. त्यामुळे या लोकांना नव्याने संसार थाटण्याची वेळ आलेली आहे. प्रशासनाकडून पाहणी व पंचनामे सुरू असून, शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आमच्या विहिरीवरील पाच एचपीचा सौरपंप या पाण्याने वाहून त्याचे तुकडे झाले आहेत. शेतातील उसावर चिखल साचून उसाचे पूर्ण नुकसान झाले आहे.

- वैभव मुरूमकर, शेतकरी, बिटरगाव श्री

Satara News:'सासुर्वेत हुतात्मा प्रवीण वायदंडेंना निरोप'; हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; शोकाकूल वातावरण

दोन एकर क्षेत्रातील लिंबोणीचे झाडे वाहून गेले तर काही झाडे उपटून पडले आहेत. सौरपंप ही वाहून गेला आहे. शासनाने याची शंभर टक्के भरपाई द्यावी.

- संदीप नलावडे, शेतकरी, बाळेवाडी

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.