पैसा ठेवा राखून! दिवाळीच्या मुहूर्तावर 5 मोठे आयपीओ बाजारात येण्यास सज्ज
ET Marathi September 19, 2025 07:45 PM
मुंबई : भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजीचे वातावरण दिसत आहे. स्टार्टअप कंपन्यांही त्यांचे आयपीओ बाजारात आणण्यासाठी सरसावल्या आहेत. सेबीच्या नियामक सुधारणा आणि देशांतर्गत एसआयपी (SIP) गुंतवणुकीने परकीय गुंतवणुकदारांच्या विक्रीतही बाजाराला मजबूत स्थिती ठेवले आहे. यामुळेच दिवाळीच्या आसपास तीन ते पाच स्टार्टअप कंपन्यांचे आयपीओ येण्याची शक्यता आहे, असे बँकर्सचे मत आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या एका रिपोर्टनुसार, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बाजारात येणाऱ्या पाच मोठ्या आयपीओची माहिती खालीलप्रमाणे आहे.



ग्रो फिनटेक कंपनी ग्रोने (Groww)ने त्यांच्या बहुप्रतिक्षित आयपीओसाठी अद्ययावत कागदपत्रे सादर केली आहेत. यामध्ये 1,060 कोटी रुपयांच्या नवीन शेअर्सची विक्री आणि सध्याच्या भागधारकांकडून 5742 लक्ष शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) समाविष्ट आहे. सक्रिय ग्राहकांच्या संख्येनुसार ग्रो भारतातील सर्वात मोठी स्टॉक ब्रोकर कंपनी आहे. बाजारातील तज्ज्ञांना विश्वास आहे की, बाजारातील परिस्थितीनुसार कंपनी दिवाळीच्या आसपास आपला आयपीओ आणू शकते.



फिजिक्सवालाPhysicsWallah या एडटेक (Edtech) फर्मने (PhysicsWallah) देखील 3,820 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी अद्ययावत कागदपत्रे सादर केली आहेत. उद्योगातील जाणकारांच्या मते, कंपनीची दिवाळीमध्ये आयपीओ आणण्याची योजना आहे, पण अंतिम वेळ कंपनीच्या तिमाही कामगिरीवर आणि मूल्यांकनावर अवलंबून असेल.



पाइन लॅब्स Pine Labs कंपनीला या आठवड्यात सेबीची मंजुरी मिळाली आहे, ज्यामुळे त्यांच्या आयपीओचा मार्ग मोकळा झाला आहे. ही फिनटेक (Fintech) युनिकॉर्न कंपनी सणासुदीच्या हंगामात आपला आयपीओ आणण्यासाठी वेगाने तयारी करत आहे. बँकर्स सांगतात की, पाइन लॅब्स ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयपीओ सादर करणाऱ्या कंपन्यांमध्ये सर्वात आधी असू शकते.



फोनपे PhonePe पुढील आठवड्यापासून आयपीओ कागदपत्रे दाखल करण्याची तयारी करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉलमार्ट-समर्थित ही पेमेंट फर्म एक अब्ज डॉलरची (88 हजार कोटी) लिस्टिंग करण्याचा विचार करत आहे आणि ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरमध्ये आपला आयपीओ आणू शकते.



लेन्सकार्ट भारतातील आयपीओ बाजारात सुरू असलेल्या तेजीचा फायदा घेण्यासाठी आणखी एक नामांकित डिजिटल कंपनी लेन्सकार्ट (Lenskart) सुमारे 2200 कोटी रुपयांची सार्वजनिक लिस्टिंग (Public Listing) करण्याची योजना करत आहे. ही भारतातील सर्वात मोठी संघटित eyewear (चष्मा) कंपनी आहे.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.