रंगपंचमीला भांग पिणं एका महिलेला चांगलच महाग पडलं. त्या एकाप्रसंगाने विवाहित महिलेच आयुष्य बदलून गेलं. तिने दोन वर्षात नको-नको ते दिवस पहावे लागले. रंगपंचमीच्या दिवशी पीडित महिला भांग प्याली होती. त्यात बेशुद्धीच औषध मिसळलेलं. भांग पिऊन महिलेची शुद्ध हरपली. आरोपीने तिच्या याच अवस्थेचा फायदा उचलला व तिचा नको तो व्हिडिओ बनवला. नंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन दोन वर्ष तिचं शारीरिक शोषण केलं. गुजरातच्या सूरतमधील हे प्रकरण आहे. विवाहित महिलेला ब्लॅकमेल करुन तिचं लैंगिक शोषण करण्यात आलं.
प्रकरण सूरतच्या डिंडोलीमधील आहे. इथे राहणाऱ्या एका विवाहित महिलेची डिंडोलीच्या माधव रेसिडन्सीमध्ये राहणाऱ्या प्रवीण रणजीतभाई पवार सोबत ओळख झाली. दोघांची ओळख मैत्रीमध्ये बदलली. त्यानंतर होळीच्या सणाला आरोपीने महिलेला भांग पाजली. त्यात बेशुद्धीची गोळी होती. महिला आरोपीला ओळखत होती. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेऊन ती भांग प्याली.
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
भांग प्राशन केल्यानंतर महिलेची शुद्ध हरपली. आपल्यासोबत काय होतय हे तिला कळत नव्हतं. आरोपीने त्या अवस्थेत तिच्यावर अत्याचार केला. तिचा अश्लील व्हिडिओ बनवला. नंतर आरोपीने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.
एवढ्यावर हा नराधम थांबला नाही
आरोपीने दोन वर्ष विवाहितेच लैंगिक शोषण केलं. एवढ्यावर हा नराधम थांबला नाही. त्याने महिलेकडून 14 लाख रुपये उकळले. यात 3.70 लाख रुपये रोख होते आणि 10.30 लाखाचा दागिने होते. या दरम्यान महिलेला ब्लॅकमेल करुन आरोपीने महिलेसोबत वेसू, अलथाण आणि दमन येथील हॉटेल्समध्ये महिलेला नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.
तिने नवऱ्याला सर्व सत्य सांगितलं
अखेरीस महिला आरोपीच्या सततच्या या ब्लॅकमेलिंगला कंटाळली. तिने नवऱ्याला सर्व सत्य सांगितलं. नवऱ्याला या बद्दल समजल्यानतंर त्याला धक्का बसला. त्यानंतर महिलेने डिंडोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.