सोलापूर : ‘चला धावूयात, सोलापूरच्या आरोग्यासाठी’ हे ब्रीद घेऊन सकाळ माध्यम समूहाच्यावतीने येत्या ५ ऑक्टोबर रोजी सोलापूरमध्ये भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय धावपटूंपासून सोलापूरातील अबालवृद्धांचा या मॅरेथॉनमध्ये सहभाग राहणार आहे.
Success Story:'विशाल केंजळेंची एमपीएससीमधून यशाला गवसणी'; जिद्दीच्या जाेरावर ११ वेळा सरळसेवा परीक्षेत सुयश, आई-वडिलांचे स्वप्न केलं पूर्ण‘सकाळ’च्या वतीने दरवर्षी पुणे, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर अशा विविध शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येते. पुण्यात २०२४ मध्ये झालेल्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत २५ हजार धावपटू सहभागी झाले होते. याच धर्तीवर सोलापूरकरांच्या खास मागणीवरून सोलापूरमध्ये ‘सकाळ’ने ही मॅरेथॉन आयोजित केली आहे.
दहा किलोमीटर, पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर अशा तीन विभागांत ही स्पर्धा होणार आहे. तीन किलोमीटर अंतराची स्पर्धा फॅमिली रन म्हणून होणार असून, यात ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आदींना सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनात फिट पेज, इंडिया रनिंग या संस्थांचा सहभाग आहे.
कोरोनानंतर मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक आरोग्याबाबत लोक जागृत झाले आहेत. स्वतःला आणि कुटुंबाला फीट ठेवण्यासाठी व्यायाम अत्यावश्यक झाला आहे. धावणे हा सर्वांना सहजरीत्या जमेल असा सर्वात सोपा आणि अधिक परिणामकारक व्यायाम प्रकार आहे. त्याची आवड निर्माण व्हावी आणि त्यात सातत्य राहावे, यासाठी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर हे क्रीडाप्रेमी शहर असून, अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू या शहरातून आणि जिल्ह्यातून तयार झाले आहेत. त्यामुळे या मॅरेथॉन स्पर्धेस सहभागी होण्यासाठी विविध क्रीडा संघटना, संस्थांनी पाठिंबा दर्शविला आहे.
सोलापूर महापालिका, सोलापूर पोलिस, जिल्हा प्रशासन, सोलापूर रनर्स असोसिएशन यांचे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य राहणार आहे. या स्पर्धेसाठी ऑनलाइन नोंदणीला प्रारंभ झाला असून, सोलापूरकरांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सोलापूरमधील प्रसिद्ध अशा होम मैदानावरून या स्पर्धेला ५ ऑक्टोबरला पहाटे सुरुवात होणार आहे. या ठिकाणी धावपटूंच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात येणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झुंबा तसेच ‘वॉर्मअप’ ची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटनास विविध क्षेत्रातील नामवंत उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांसाठीमॅरेथॉनमध्ये पाच आणि दहा किलोमीटर धावणाऱ्या स्पर्धकांना टी-शर्ट, मेडल्स, टाइम चीप, बीब, चांगल्या दर्जाचा नाश्ता, ई- सर्टिफिकेट, गुडी बॅग दिली जाणार आहे. तीन किलोमीटर फॅमिली रनमधील सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना टी-शर्ट, मेडल्स, नाश्ता आणि गुडी बॅग दिली जाणार आहे. स्पर्धेत क्रमांक मिळविलेल्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.
Smart Meter: मीटरचा हिशोब ‘स्मार्ट’ की फसवा?; वाढीव वीजबिलांमुळे ग्राहक संतप्त, दुरुस्तीसाठी महावितरण कार्यालयात रांगा येथे करा नोंदणीया स्पर्धेत सहभागी होणाऱ्या India Running च्या https://share.google/6fljqlWuVdlVbSx9A या वेबसाईटवर क्लिक करा. किंवा सात रस्ता चौक परिसरातील कृष्णा आईस्क्रीमशेजारील चैतन्य भुवन येथील ''सकाळ''च्या कार्यालयात ऑफलाईन नोंदणी करता येईल.