मराठीमध्ये आता रहस्य, हास्य आणि कौटुंबिक भावबंधांचा संगम घडवणारा एक नवा चित्रपट ‘स्मार्ट सुनबाई’ प्रेक्षकांसमोर येत आहे. दिग्दर्शक शिवाजी दोलताडे आणि निर्माते गोवर्धन दोलताडे, गार्गी तसेच सहनिर्माता कार्तिक दोलताडे पाटील यांचा हा चित्रपट येत्या २१ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
नुकतेच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता लागली आहे. ‘स्मार्ट सुनबाई नक्की कोण आणि तिच्या आयुष्यातील अनोखं रहस्य काय?’ हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
या चित्रपटात रोहन पाटील, संतोष जुवेकर, भाऊ कदम, मोहन जोशी, दीपक शिर्के, अंशुमन विचारे, विनम्र बाबल, सायली देवधर, प्राजक्ता गायकवाड, किशोरी शहाणे, उषा नाईक यांच्यासह अनेक दिग्गज आणि लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत.
Premium| Bollywood Golden Era: १९५४ साल भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाकारांसाठी आणि दिग्दर्शकांसाठी महत्त्वाचे का होते?‘स्मार्ट सुनबाई’ची कथा आणि लेखन योगेश शिरसाट यांनी केले असून, संगीत दिग्दर्शन विजय नारायण गवंडे व साई-पियुष यांनी केले आहे. गीतकार वैभव देशमुख व अदिती द्रविड यांच्या गीतांना अजय गोगावले, वैशाली माढे, आनंदी जोशी, सावनी रवींद्र यांच्यासह अन्य गायकांनी स्वर दिले आहेत.