तांबवे: गेली ५० वर्षे (कै.) विलासकाका यांनी सातारा जिल्ह्यात यशवंतरावांचे विचार जोपासले. जातीयवादी पक्षाच्या त्यांना ऑफर आल्या; पण ते पुरोगामी विचारांपासून ढळले नाहीत. सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन आम्हीही वाटचाल करत आहोत. आतापर्यंत जशी विलासकाकांना साथ दिली, तशीच साथ मलाही द्या, असे आवाहन रयत कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी केले.
Success Story:'विशाल केंजळेंची एमपीएससीमधून यशाला गवसणी'; जिद्दीच्या जाेरावर ११ वेळा सरळसेवा परीक्षेत सुयश, आई-वडिलांचे स्वप्न केलं पूर्णआगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी साजूर येथील युवकांशी संवाद साधला. यावेळी प्रा. धनाजी काटकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रदीप पाटील, श्रीमंत काटकर, बाजार समितीचे माजी संचालक रघुनाथ नलवडे, हणमंत देसाई-वाठारकर, खरेदी- विक्री संघाचे हणमंतराव चव्हाण, मोहन चव्हाण,
संजय मुळगावकर, विक्रम मुळगावकर, माजी सरपंच शीतल मुळगावकर, संजय चव्हाण, वैभव चव्हाण आदी उपस्थित होते. या वेळी युवकांनी विकासकामे व रोजगारासंदर्भातही प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर ॲड. उंडाळकर म्हणाले, ‘‘युवकांनी मांडलेले प्रश्न, अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करेन. साजूर गावाने नेहमीच विलासराव उंडाळकर यांच्या विचाराची पाठराखण केली आहे.’’
Smart Meter: मीटरचा हिशोब ‘स्मार्ट’ की फसवा?; वाढीव वीजबिलांमुळे ग्राहक संतप्त, दुरुस्तीसाठी महावितरण कार्यालयात रांगाकाकांचे साजूर गावातील विकासकामांमध्ये मोठे योगदान आहे, याची याची जाणीव तरुणांना असल्याचे प्रकर्षाने जाणवले. येथून पुढेही आतापर्यंत जशी विलासकाकांना साथ दिली, तशीच साथ मलाही द्या. तरुणांनी ज्या काही अडचणी मांडल्या, त्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन, अशीही ग्वाही त्यांनी दिली. प्रा. काटकर, प्रदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. विक्रम मुळगावकर यांनी आभार मानले.